Nashik Drug Issue : नाशिकचा ड्रग्ज डीलर भूषण पाटीलसह साथीदारास अयोध्येतून अटक, पुणे पोलिसांची कामगिरी, ललित पाटीलही गळाला?
Nashik Crime News : नाशिकच्या (Nashik) शिंदे गावात ड्रग्ज निर्मितीचा कारखाना चालविणाऱ्या भुषण पाटीलश त्याचा साथीदारास पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) ड्रग्ज संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. नाशिकमधून फरार झालेल्या भूषण पाटीलला पुणे पोलिसांनी अटक केली. ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भुषण पाटील (Bhushan Patil) आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील आयोध्येजवळून ताब्यात घेतले. ललित पाटील ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर भुषण पाटील आणि अभिषेक बलकवडे देखील पसार झाले होते. मात्र पुणे पोलिसांनी शिताफीने अयोध्येतून ताब्यात घेतले.
नाशिक शहरातील (Nashik Drug Factory) शिंदे गावातील (Shinde Village) ड्रग्ज प्रकरण राज्यभरात चर्चेत आले. त्यानंतर सलग तीन दिवस कारवाईनंतर मोठा ड्रग्जचा कच्चा आणि तयार माल जप्त करण्यात आला. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) कारवाई, त्यानंतर नाशिक पोलिसांनी टाकलेली धाड, या तीन दिवसांच्या कारवाईत जवळपास 5 कोटी रुपयांची 4 किलो 780 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर आणि कच्चा माल हस्तगत करण्यात आला. या कारवाईने जिल्ह्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. या करवाईनंतर येथील कारखाना चालविणारा भूषण पाटील हा फरार झाल्यांनतर नाशिकसह पुणे (Pune Police), मुंबई पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती. त्याचबरोबर ससून रुग्णालयातून पळून गेलेला ललित पाटीलचा (lalit Patil) देखील शोध घेण्यात येत होता. अखेर ड्रग्ज प्रकरणातील भूषण पाटील याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
नाशिक शहराजवळील शिंदे गाव अचानक चर्चेत आलं. याला कारण ठरले आहे ते एमडी ड्रग्स. शिंदे गावात काही दिवसात मुंबई पोलीस आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या दोन कारवायांमध्ये कोट्यवधींचे एमडी ड्रग्स (MD drug) आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. या ठिकाणी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा ड्रग्ज कारखाना चालवत होता. भुषण पाटील हा केमिकल इंजिनियर असुन मेफेड्रॉन तयार करण्याच प्रशिक्षण घेतल्यावर तो नाशिक एमआयडीसीमध्ये मेफेड्रॉन तयार करण्याच काम करत होता. भुषण पाटील मेफेड्रॉन तयार करायचा, अभिषेक बलकवडे त्याची वाहतूक करायचा तर ललित पाटील प्रत्यक्ष डील करायचा, असा सगळा कारभार सुरु होता. अखेर फरार झालेल्या भूषण पाटीलसह टायचा साथीदार बलकवडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ड्रग्समाफियांमागे कोणाचा वरदहस्त?
एमडी ड्रग्सची नाशिकमध्ये सर्रासपणे विक्री होत असल्याची चर्चा असतांनाच तीन दिवसातील या तीन कारवायांमुळे धार्मिक नगरी म्हणून समजल्या जाणाऱ्या नाशिकची ओळख आता ड्रग्सचे माहेरघर अशी होऊ लागलीय का? अशी भिती व्यक्त केली जात आहे. तसेच आता भूषण पाटीलसह त्याचा साथीदारास ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील तिन्ही जिल्ह्यातील पोलीस नेमकं कसा तपास करतात? यातून कोणा कोणाचा सहभाग स्पष्ट होतो? ड्रग्समाफियांमागे कोणाचा वरदहस्त आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी :
Pune Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ आणि साथीदाराला अटक