Sanjay Raut : खासदार संजय राऊत सुनावणीस गैरहजर, मालेगाव कोर्टाचे 4 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?
Nashik News : खासदार संजय राऊत हे आज मालेगाव कोर्टात गैरहजर राहिले असून कोर्टाने पुढील तारीख दिल्याचे समोर आले आहे.
नाशिक : मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना आज मालेगाव (Malegaon) येथील न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत दसरा मेळावा असल्याने गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी असा विनंती अर्ज केला होता. त्यानुसार संजय राऊत आज गैरहजर राहिल्याचे बोलले जात आहे.
मालेगाव येथील गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी 178 कोटींचा भ्रष्टचार केला असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या बदनामी प्रकरणी दादा भुसे यांनी राऊत यांच्या विरोधात मालेगाव कोर्टात मानहाणीचा दावा दाखल केला. आज त्याची सुनावणी होती. त्यामुळे संजय राऊत मालेगावला येऊन कोर्टात हजर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र संजय राऊत हे आज गैरहजर राहिले असून कोर्टाने पुढील तारीख दिल्याचे समोर आले आहे. दसरा मेळावा असल्याने हजर राहता येणार नसल्याचे संजय राऊत यांच्याकडून कोर्टाला सांगण्यात आले. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना 4 नोव्हेंबरची तारीख देण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही महिन्यांपूर्वी मालेगाव येथील, सभेत दादा भुसेंवर जोरदार टीका केली होती. यानंतर दै.सामना या वृत्तपत्रातुन देखील गिरणा सहकारी साखर कारखान्यात दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा छापले होते. त्यामुळेच दादा भुसे यांनी चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या मा.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामान्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दै.सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याने आरोप खा.संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.
संजय राऊत आज गैरहजर...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बंडानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मे महिन्यात उद्धव ठाकरेंची (Udhhav Thackeray) मालेगावात जाहीर सभा झाली होती. यावेळी बोलताना आपल्या भाषणातून संजय राऊत यांनी गिरणा साखर कारखान्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत भुसेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर सामना या मुखपत्राच्या मराठी आवृत्तीमधून राऊत यांनी दादा भुसेंवर आरोप केला होता. या खटल्यासंदर्भात खा.संजय राऊत यांना खुलासा करण्यासाठी आज मालेगाव येथील मे.न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, खा.संजय राऊत हे आज स्वतः मालेगाव न्यायालयात हजर राहतात की, वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामनामध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून भुसे यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी :