Nashik Sambhajiraje : नेत्यांनो शिवराय-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार कागदापुरता नका ठेऊ, तळागाळापर्यंत पोहचवा, संभाजीराजेंचे आवाहन
Sambhajiraje Chatrapati : शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार असल्याचे संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी स्पष्ट करत नेत्यांना सुनावले.
नाशिक : महात्मा फुले (Mahatma Fule), शाहू महाराज (Shahu Maharaj), डॉ. आंबेडकर (Dr. Ambedkar) यांचे नाव सत्ताधारी का घेत नाही, हे आपण नेत्यांना विचारायला पाहिजे, महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी यांनी प्रयत्न केले नाही का? असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला. तसेच राजकारणात मोठ्या पदावर बसलेले पुढारी, नेत्यांना माझी विनंती आहे की, नुसता शिवराय-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार फक्त कागदापुरता मर्यादीत ठेऊ नका तर शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार असल्याचे संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी स्पष्ट करत नेत्यांना सुनावले.
आज संभाजीराजे छत्रपती हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. सत्यशोधक समाजाच्या राज्य अधिवेशनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सध्या अनेक राजकीय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. अशातच राज्यभरात वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनी महापुरुषांना वाटण्याऐवजी एकत्र आणण्याचे काम केले पाहिजे असा सल्ला संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) यांनी दिला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर महापुरुषांना विसरून चालणार नाही, शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना जनमानसात पेरलं गेलं पाहिजे, ते होताना दिसत नाही. महापुरुषांचे विचार जेव्हा घराघरात जातील तेव्हाच महाराष्ट्र पुढे जाईल, असेही संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे यावेळी म्हणाले की, छत्रपतींनी सत्यशोधक विचारांना चालना दिली. आपण शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे नेणार असू तर राजकारणात कॉम्प्रेमाईस नाही. पार्लमेंटमध्ये हा विषय बोलणारा मी एकमेव खासदार आहे. त्याकाळी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिल, मराठवाड्यातील लोकांना बहुजन समाजाबद्दल माहीतच नाही, शाहू महाराजांचे कार्य जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील सगळ्या पुढाऱ्यांची जबाबदारी की शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे विचार जगभर पसरवावे, असा सल्ला संभाजीराजे यांनी दिला. अनेक राजकीय नेत्यांकडून महापुरुषांबाबत सोयीनुसार भूमिका बदलली जात आहे, असं करू नका. अशा कार्यक्रमांना सगळ्या नेत्यांना पत्र पाठवून निमंत्रित करा, सॉफ्ट हिंदुत्व या विषयावर मी नक्की बोलेन, पण आता नाही. शाहू महाराजांनी शंकराची पिंड हातावर कोरली आहे, मग हे काय आहे? याच विचारांसाठी एकत्र आलं पाहिजे. सगळ्या समाजातील पक्षाच्या लोकांनी महाराष्ट्रात कुठल्याही पक्षात राहा, मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारांशीवाय तुम्हाला पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
मराठा आंदोलनावर म्हणाले...
मराठा आंदोलन उपोषणकर्ते मनोज जरांगेची मागणी सरकार तपासून घेत आहे. मूठभर नेते दोन समाजात वाद लावत आहेत, तसे काही नाही. शिवाजी महाराजांनी 18 पगडजाती, 12 बलुतेदार यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं, शाहू महाराजांनी 1902 साली बहुजनांना आरक्षण दिले, ते अनुसूचित जाती जमाती, ओबीसी आणि मराठा समाज समाविष्ट आहेत. माझ मत आहे की गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे, त्यावर लाईन द्यायला हवी, यापूर्वीच माझी मागणी होती. पण सामाजिक मागास कसे सिद्ध कराल? सर्वेक्षण करायला पाहिजे, यावर कोणी बोलत नाही. न्यायालयाने तुम्ही सामाजिक मागास नाही, असे म्हंटले, ते सिद्ध करायला लागेल आणि मग या पुढच्या गोष्टी आहेत. जरांगेची मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावे. हे तुमच्या कायद्यात बसत असेल तर सरकारने द्यावे, त्याला मी सपोर्ट करेल, पण कुठेतरी अडकवण्यासाठी काहीतरी करू नये, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाची बातमी :
Nashik News : संभाजीराजेंकडून नाशिकमध्ये तळ ठोकण्यास सुरुवात; आज पुन्हा दौऱ्यावर, असा आहे कार्यक्रम