Nashik News : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लासलगाव बाजार समिती 12 दिवस राहणार बंद, काय आहे कारण?
Nashik News : कांद्याची पंढरी अशी ओळख असलेली नाशिकची लासलगाव बाजार समिती (Lasalgaon) आता 12 दिवस बंद राहाणार आहे.
नाशिक : कांद्याची पंढरी अशी ओळख असलेली नाशिकची लासलगाव बाजार समिती (Lasalgaon) आता 12 दिवस बंद राहाणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारसमिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत ही बाजारपेठ बंद राहणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिल्लक कांदा (Onion Auction) विकून दिवाळी साजरी करता येईल, अशी शेतक-यांना अपेक्षा होती. मात्र आता ती आशाही फोल ठरताना दिसते आहे.
दीपावली सणानिमित्त (Diwali 2023) कांदा विभागातील व्यापारी वर्ग हे कांदा या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lasalgaon Bajar Samiti) मुख्य कांदा बाजार आवार आजपासून म्हणजेच 7 नोंव्हेबर पासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाला दिले. विभागातील व्यापारी वर्ग हे कांदा या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने तसेच शुक्रवारी ते शनिवारी नोव्हेंबरअखेर धान्य विभागातील व्यापारी वर्ग हे धान्य या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने बाजार समिती बंद राहणार आहे.
नाशिकच्या (Nashik) लासलगाव बाजारपेठेतूनच देशभरात कांद्याचा पुरवठा केला जातो. यंदा सुरवातीपासूनच कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत आहेत. त्यातच कांदा दराच्या चढउतारामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अशातच शिल्लक राहिलेला कांदा दिवाळीपूर्वी विकून सणाला गोडधोड करण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. आता दिवाळीनिमित्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सलग बारा दिवस बंद राहणार आहे. कांदा लिलाव बंद राहणार असल्याने देशभरात परिणाम जाणवण्याची चिन्हे आहेत. दिवाळीमुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यावरील कामगार गावी जात असल्याने बाजार समितीत होणारे लिलाव बंद राहतात.
बाजार समितीकडून आवाहन
लासलगाव बाजार समिती मर्चंट असोसिएशनच्या कांदा आणि धान्य विभागातील व्यापारी वर्गाच्या पत्रानुसार लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांद्याचे लिलाव दीपावली आणि साप्ताहिक सुट्टी निमित्त बंद राहणार आहे. तसेच धान्य या शेतीमालाचे लिलाव 09 नोंव्हेबरपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत लिलाव बंद राहणार आहे. शेतकरी बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीच्यावतीने शेतकरी बांधवांना सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून लासलगाव बाजार समितीला बारा दिवस बंद राहणार आहे. लासलगाव बाजार समितीत आजपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव बंद राहतील, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी :
Lasalgaon Onion Market : लासलगाव बाजार समिती आजपासून 12 दिवस बंद