Nashik Protest : पहाटे पत्नीच्या डोक्यात मुसळी घातली, नंतर स्वतःही जीवनयात्रा संपवली, नाशिकच्या आडगाव येथील मर्डर मिस्ट्री
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील आडगाव परिसरात पतीने पत्नीची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
![Nashik Protest : पहाटे पत्नीच्या डोक्यात मुसळी घातली, नंतर स्वतःही जीवनयात्रा संपवली, नाशिकच्या आडगाव येथील मर्डर मिस्ट्री Nashik latest News Husband commits suicide by killing his wife in Adgaon area of Nashik city maharashtra news Nashik Protest : पहाटे पत्नीच्या डोक्यात मुसळी घातली, नंतर स्वतःही जीवनयात्रा संपवली, नाशिकच्या आडगाव येथील मर्डर मिस्ट्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/13/44f1f0fd5e9dbcb6ae09fd97023244041694603710201738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील जेलरोड परिसरात अनैतिक संबंधांतून पत्नीने पतीची हत्या (Murder) घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना ताजी असतानाच शहरातील आडगाव परिसरातून धक्कादायक घटना घडली आहे. झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात मुसळी मारून हत्या करत स्वतःही गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात भाईगिरी फोफावली असून पूर्व वैमनस्यातून खुनाच्या घटना घडत आहेत. याच बरोबर अलीकडेच कौटुंबिक वादातून थेट कोणालातरी संपवण्याचे प्रकार वाढत चालले आहे. कौटुंबिक वाद, पती पत्नीचा वाद यातून अशा घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील आडगाव परिसरात इच्छामणी नगरमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास पतीने पत्नीची हत्या करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. झोपेत असतानाच पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आलं आहे. तर त्यानेही घरातच गळफास घेत स्वतःला संपविले आहे. घटनेने कुटुंबावर मोठा आघात झाला असून घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.
आडगाव (Adgaon) परिसरात राहत असलेल्या विशाल निवृत्ती घोरपडे (Vishal Ghorpade) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर प्रिती विशाल घोरपडे असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी विशाल घोरपडे याने आपली पत्नी प्रिती ही गाढ झोपेत असतांना तिच्या डोक्यात मुसळी टाकत तिची हत्या केली. त्यानंतर विशाल घोरपडे याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना समजताच घोरपडे कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी दाखल झाले, समोरच दृश्य पाहून कुटुंबीयांची पायाखालची जमीनच हादरली. घरातल्या सर्वच सदस्यांनी हंबरडा फोडला. मात्र विशाल घोरपडे यांनी पत्नीचा खून करत आपली जीवन यात्रा का संपवली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घोरपडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं कारण समजू शकलेले नाही....
आडगाव परिसरात इच्छामणी नगरमध्ये घोरपडे कुटुंबीय राहत होते. आज सकाळी अचानक विशाल याने बायको प्रीती झोपेत असताना घरात असलेल्या मुसळीने डोक्यात वार केला. यात रक्तश्राव अधिक झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर त्यांनतर विशाल याने स्वतः घरात गळफास स्वतःला ससंपवले.. या घटनेने कुटुंबीय देखील मानसिक धक्क्यात असून विशाल घोरपडे याने आपल्या पत्नीची हत्या का केली? त्याची पत्नी प्रीती यांच्यात काही वाद झाले होते का? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. या हत्येमुळे नाशिक शहरासह इच्छामणी नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)