Girish Mahajan : राष्ट्रवादीमुळे काँग्रेस-शिवसेना परेशान, शरद पवारांनी एकदाचा निर्णय घ्यावा, गिरीश महाजन यांचा सल्ला
Girish Mahajan : सकाळी काय बोलतात, दुपारी काय बोलतात, भाषणात वेगळंच बोलतात, दुसरीकडे म्हणतात, त्यांचा-आमचा प्रश्न मिटला आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी शरद पवारांवर केली.
नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकू नये, त्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन एकदाचा निर्णय घ्यावा. सकाळी काय बोलतात, दुपारी काय बोलतात, भाषणात वेगळच बोलतात, दुसरीकडे म्हणतात, त्यांचा-आमचा प्रश्न मिटला आहे, त्यामुळे लोक, कार्यकर्ते संभ्रमात असून काँग्रेस-शिवसेना राष्ट्रवादीमुळे (NCP) तर परेशानच झाली आहे. त्यामुळे दोघांमध्ये एकवाक्यता ठेवावी, स्वतःमध्ये एकवाक्यता ठेवावी, असा सल्लाही गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.
आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या (Nashik) लासलगाव (Lasalgaon) बाजार समितीत जाऊन शेतकरी व्यापाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते महाजन म्हणाले की केंद्र सरकारने कांद्याच्या संदर्भात (Onion Issue) चोवीस ते दहा रुपये इतका विक्रमी भाव दिला आहे त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांकडून आंदोलन, रास्ता रोको केला जात आहे. लासलगाव येथे शेतकऱ्यांसोबत कांदा प्रश्नावर चर्चा केली. 2410 रुपये भाव दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. त्यामुळे नाफेडची (NAFED) कांदा खरेदी केंद्र वाढवावी लागणार आहे, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा लागेल, नाफेडच्या माध्यमातून खरेदी होत असताना व्यापाऱ्यांचा भलं होत असल्याचा आरोप लोकांकडून केला जात असल्याचं महाजन म्हणाले. प्रत्यक्षात फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करू, असे आश्वासन देखील यावेळी महाजन यांनी दिले.
कांदा शेतकऱ्यांचा (Onion farmers) प्रत्यक्ष कथा घेतला जाईल त्याला भाव कसा मिळेल याबाबत सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत केले जातील कांदा खरेदी ही शेतकऱ्यांसमोर झाली पाहिजे मागण्या शेतकऱ्यांचा असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांसह सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कांदा प्रश्नावर तोडगा काढला जाईल असेही महाजन यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कायमस्वरूपी या शेतकऱ्याचा दिलासा कसा देता येईल तर कांदा चाळी वाढल्या पाहिजेत, त्याच्यावर अनुदान वाटलं पाहिजे, शेतकऱ्यांची साठवण क्षमता वाढली पाहिजे, भाव वाढले असताना हाच कांदा शेतकऱ्यांना बाजारात आणता येईल, असेही महाजन म्हणाले.
निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द होणार नाही....
निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द होणार नाही, सरकार तसा निर्णय करणार नाही, असं जर केलं तर निर्यात शुल्क कमी झालं आणि सगळ्या कांदा बाहेर गेला तर येणार वर्ष अवघड जाईल, पाऊस नाही, कांदा लागवड झालेली नाही. वर्षभरात कांद्याचं शॉर्टेज होण्याची शक्यता आहे. मग राज्याच्या लोकांना आपण काय देणार असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. मग शंभर रुपये झालेला कांदा चालेल का? सव्वाशे रुपये झालेला कांदा चालेल का? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांसह ग्राहकाचे हित साधलं गेलं पाहिजे. या दोघांमध्ये समन्वय राखून हा निर्णय घेतला आहे. विजय वडेट्टीवार शरद पवार यांनी जी मागणी केली, की कांद्याला चार हजार रुपये भाव द्या, मग तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना शंभर रुपयांच्यावर अनुदान दिलं नाही, या सरकारने साडेतीनशे रुपये अनुदान दिले, आज ना उद्या हे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन गिरीश महाजन यांनी दिले.