Nashik : नाशिक महापालिकेचा फटाक्यांबाबत अजब फतवा; सोशल मीडियावर संताप, काही तासांतच सुधारित पत्रक
Nashik News : रात्री दहानंतर फटाके फोडा, असा अजब फतवा नाशिक महापालिकेनं काढला होता.
Nahik News : नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) अजब फतव्यामुळे नाशिककरांनी संताप व्यक्त केला. 'रात्री दहानंतर फटाके फोडा', असा अजब फतवा नाशिक महापालिकेने काढला होता. त्यामुळे अधिकारी झोपेत काम करतात असा सवाल उपस्थित केल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली. आणि त्यानंतर फटाक्यांबाबत सुधारित पत्रक (Circulation) काढण्यात आले. मात्र आधीच्या पत्रकामुळे नाशिककर चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
दिवाळीचा (Diwali 2023) माहोल सुरू झाला असून नाशिककरांची (Nashik Diwali) देखील मोठी लगबग सुरु झाली आहे. फराळ खरेदीपासून, कपडे, फटाके, सजावटीचे साहित्य आदींची खरेदी केली जात आहे. दिवाळी म्हटलं की फराळाबरोबर फटाके हे समीकरण झालेले आहे. त्यामुळे दिवाळी फटाके फोडून आनंद साजरा केला होता. मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या प्रदूषणामुळे संबंधित प्रशासनाकडून नागरिकांना प्रदूषण वाढविणारे फटाके वाजवू नये असे आवाहन केले जाते. याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेकडून पत्रक काढण्यात आले होते. यात रात्री दहानंतर फटाके फोडा असा अजब फतवा काढण्यात आला होता. यामुळे अधिकारी झोपेत काम करतात का? असा सवाल नाशिककरांनी उपस्थित केला. मात्र काही तासानंतर चूक लक्षात आल्यानंतर सुधारित पत्रक काढण्यात आले आहे.
रात्री दहानंतर फटाके फोडा, असा अजब फतवा नाशिक महापालिकेने काढला होता. दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काल सायंकाळी महापालिका पर्यावरण विभागाने काढलेल्या पत्रकात पर्यावरणपूरक फटाके फोडा, प्रदूषण होणार नाही तसेच कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, यांसह रात्री दहानंतर फटाके फोडा असे नमूद करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. सोशल मिडीयातही नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत होत्या. दरम्यान ही टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगत महापालिकेकडून रात्रीतूनच सुधारीत पत्रक काढण्यात आले असून त्यात वेळेच्या मर्यादेचा उल्लेखच करण्यात आलेला नाही.
नाशिक मनपा क्षेत्रातील सर्व नागरीकांना आवाहन
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दिवाळीच्या निमित्ताने होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकाने नागरिकांना आवाहन केले आहे. यात नागरिकांना पर्यावरणपूरक (हरीत) फटाके फोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फटाके फोडल्याने प्रामुख्याने हवा आणि ध्वनी प्रदूषण होते. मोठ्या लोकांनी जागरूकता ठेवून फटाके अतिप्रमाणात न वाजवणे व लहान मुलांना धोकादायक नसलेले फटाके वाजवू देणे. वायु व ध्वनीप्रदुषण कमी करण्यासाठी नागरीकांनी स्वतःहून प्रयत्न करावे. फटाका वाजलेल्या स्थानापासून 4 मीटर अंतरापर्यंत 145 डीबी (सी) च्या 125 डीबी (एआय) ध्वनीपातळीचे उल्लंघन करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन आणि विक्रीस मनाई आहे. नाशिककरांनी महानगरपालिकेच्या आवाहनाचे पालन करून दिवाळीचा आनंद घेतांना पर्यावरणाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Diwali 2023 : रात्री 10 नंतर फटाके फोडा , नाशिक महापालिकेचा अजब निर्णय