एक्स्प्लोर

Booster Dose : नाशिकमध्ये मोफत बूस्टर डोससाठी 19 लसीकरण केंद्रे सज्ज, 24 तास लसीकरण

Booster Dose : तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोनाशी (Covid-19) लढा देत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही.

Booster Dose : तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोनाशी (Covid-19) लढा देत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा चढता आलेख दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाबाबत मोठा घेतला आहे. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 'बूस्टर डोस' (Booster Dose) मोफत देण्याची घोषणा केली आहे. देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. यासाठी नाशिक मनपा प्रशासन देखील सज्ज झाले आहे. नाशिक महानगरपालिका  क्षेत्रात शुक्रवार दि. 15 जुलै पासून  पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना कोविड लसीचा  बूस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्याचा देण्यात येणार आहे. 
 
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस पूर्ण केला आहे. आणि त्यांना दुसरा डोस  घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी  नाशिक महानगपालिकेच्या जवळच्या  लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने  नोंदणी करु शकतात. नाशिक महानगरपालिकेच्या शहरातील खालील दिलेल्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात बूस्टर डोस मिळेल.
 
नाशिक महानगरपालिकेचे  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (नवीन बिटको) रुग्णालय येथे २४ तास लसीकरण केंद्र सुरु राहणार आहे.  तसेच ज्या लाभार्थ्यांचे २रा डोस बाकी असेल अशा लाभार्थ्यांनी तो लवकरत लवकर घ्यावा. आरोग्य केंद्रामध्ये मोफत बूस्टर डोस देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ करू नये. नाशिक महानगरपालिकडे लससाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.                          
 
नाशिक महानगरपालिका कोविड 19 लसीकरण केंद्राची नावे 
 
कोविशील्ड 
मायको पंचवटी श. प्रा. आ. केंद्र, मखमलाबाद श. प्रा. आ. केंद्र, नांदूर श. प्रा. आ. केंद्र, हिरावाडी श. प्रा. आ. केंद्र, म्हसरूळ श. प्रा. आ. केंद्र, रेड क्रॉस श. प्रा. आ. केंद्र, तपोवन श. प्रा. आ. केंद्र. 
 
नशिकरोड विभाग 
नाशिकरोड श. प्रा. आ. केंद्र, गोरेवाडी श. प्रा. आ. केंद्र, दसक पंचक श. प्रा. आ. केंद्र, वडनेर दुमाला श. प्रा. आ. केंद्र, सिन्नर फाटा श. प्रा. आ. केंद्र, नवीन बिटको हॉस्पिटल 
 
सातपूर विभाग 
मायको सातपूर श. प्रा. आ. केंद्र, एम एच बी श. प्रा. आ. केंद्र, गंगापूर श. प्रा. आ. केंद्र, संजीवनगर श. प्रा. आ. केंद्र, इ. एस. आय. एस हॉस्पिटल.
 
नाशिक पूर्व विभाग 
वडाळागाव श. प्रा. आ. केंद्र, भारत नगर श. प्रा. आ. केंद्र, एस जी एम श. प्रा. आ. केंद्र, बजरंगवाडी श. प्रा. आ. केंद्र, उपनगर श. प्रा. आ. केंद्र, झाकीर हुसेन रुग्णालय.
 
नाशिक पश्चिम विभाग  
जिजामाता श. प्रा. आ. केंद्र, सुदर्शन कॉलनी श. प्रा. आ. केंद्र, बारा बंगला श. प्रा. आ. केंद्र. 
 
सिडको विभाग 
अंबड श. प्रा. आ. केंद्र, पिंपळगाव खाम श. प्रा. आ. केंद्र, स्वामी समर्थ रुग्णालय, सिडको श. प्रा. आ. केंद्र, कामातवाडे श. प्रा. आ. केंद्र.
 
कोवॅक्सिन 
तपोवन श. प्रा. आ. केंद्र, नवीन बिटको हॉस्पिटल, सिडको श. प्रा. आ. केंद्र, झाकीर हुसेन रुग्णालय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP MajhaTOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
Embed widget