एक्स्प्लोर

Nashik Grampanchayat : नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतीत पुन्हा निवडणुकांचा धुरळा, तर 149 जागांवर पोटनिवडणुक, 'या' गावात रणधुमाळी

Nashik Grampanchayat Election : नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram panchayat Election) जाहीर झाल्या आहेत.

नाशिक : डिसेंबरअखेर मुदत संपुष्टात येणाऱ्या आणि चुकीच्या प्रभाग रचनेमुळे निवडणुका होऊ न शकलेल्या नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram panchayat Election) जाहीर झाल्या आहेत. तर 149 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या 16 ऑक्टोबरपासून नामनिर्देशनपत्रे होणार असून नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा (Gram Panchayat Election) कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 207 रिक्त ग्रामपंचायतीमध्ये जागांसाठी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 2067 निवडणुकीच्या कार्यक्रमात राज्यातील नाशिकमधील 149 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. चुकीच्या प्रभाग रचनेमुळे ज्या प्रभागांमध्ये निवडणुका होऊ शकलेल्या नव्हत्या, अशा प्रभागांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय जनतेतून थेट सरपंच निवड होणार असल्याने या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 48 ग्रामपंचायतीत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. तसेच 149 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकादेखील होणार आहे. इगतपुरी, मालेगाव, दिंडोरी, येवला, कळवण, निफाड, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), देवळा, बागलाण, नाशिक या तालुक्यात निवडणुकीचा बार उडणार आहे. या शिवाय जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, येवला, पेठ तालुक्यात थेट सरपंचपदासाठी निवडणूक रंगणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यात देखील पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायतीवरील वर्चस्वासाठी राजकीय फड चांगलाच रंगणार आहे.

48 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक

इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी, धारगाव, शिरसाठे, नागोसली, ओडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दॉडत, उंबरकोन, सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, सोमज, मोगरे, मोंडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, नांदगाव सदो इत्यादी गावे. तर मालेगाव तालुक्यातील मांजरे, दिंडोरी तालुक्यातील गवळवाडी, येवला तालुक्यातील लोकी शिरस, शिरसगाव लौकी, कळवण तालुक्यातील सरलेदिगर, कोसवन, कड़की, देसगाव, करंभेळ, तर निफाड तालुक्यातील पालखेड, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादेवनगर, सोमनाथनगर, मेटघरकिल्ला. साप्ते, सापगाव. हरसूल. देवळा तालुक्यातील मेशीर, माळवाडी, फुलेमाळवाडी. बागलाण तालुक्यातील चिराई, भवाडे, केळझर, भाक्षी, मुळाणे, केरसाणे, जामोटी, तताणी, नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर, गंगाम्हाळुगी, पिंपळगाव ग. सुभाषनगर आदी गावांत सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 

याठिकाणी थेट सरपंच निवडणूक

निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे, जिव्हाळे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द, येवला तालुक्यातील जऊळके, पेठ तालुक्यातील तिर्धे या गावात थेट सरपंच निवडणूक होणार आहे.

इथं होणार पोटनिवडणुक

नाशिक तालुक्यातील रायगडनगर, इंदिरानगर, आंबेबहुला, लाडची, शिवणगाय, गणेशगाव. निफाड तालुक्यातील भेंडाळी, देवपूर, हनुमाननगर, कुरुडगाव, मौजे सुकेणे, शिपीटाकळी, नारायण टेंभी, थेटाळे, जिव्हाळे, चावी. कळवण तालुक्यातील गोबापूर, खेडगाव, नरुळ, दरेभणगी, कुंडाण औ वडवणी, शिंगांशी, आळंबे, भैताने दी, निवाने, तताणी, सुकापूर. इगतपुरी तालुक्यातील पिप्रीसदोद्दीन, फांगुळगाव, चिंचळखैरे, आवळखेड, धानोली, तळोशी, मुरंबी, कुम्हेगाव, चलायदुरी, भावली बु. आहुर्ली, टिटोली, कुणॉली, टाकेद बु, घोटी खुर्द, येवला तालुक्यातील ममदापूर, जउळके, खैरगव्हाण. दिंडोरी तालुक्यातील ननाशी, पुणेगाव कवडासर, धागुर, कोल्हेर, रवळगाव, देवठाण, पिंपळगाव धूम, टिटवे, रासेगाव, कोकणगाव, वरवंडी, देहरे, ओझरखेड, रामशेज, जांबुटके, नळीवाडी, गरबड.

मालेगाव तालुक्यातील शिरसोंडी, निळगव्हाण, धोंडेगाव, शेंदुर्णी, नांदगाव बुद्रुक. सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे, चोंडी, गुळवंच, पाथरे बुद्रुक, मानोरी, भरतपूर. पेठ तालुक्यातील उस्थळे, भुवन, अमलोन, डोल्हारमाळ, धानपाडा, गोंदे, शेवखंडी, सावळघाट, तिर्धे. सुरगाणा तालुक्यातील राजा चिकाडी भवानदगड, कुकुड मुंडा, वरंभे, हेमाडपाडा, डोंगराळे, कोठुळा. देवळा तालुक्यातील सुभाष नगर मटाने चिंचवे तर त्र्यंबक तालुक्यातील आव्हाटे, होलदारनगर, जातेगाव बु., मेटचंद्राची, नांदगाव कोहली, वाढोली, गोलदरी, विजयनगर. बागलाण तालुक्यातील आखतवाडे, कपालेश्वर, खामलोण, जोरण, तुंगणदिगर, भिलवाड, मोरकुरे, विसापूर, पिंगळवाडे, नंदिन, पारनेर, किकवारी खु. सुराणे, आलीयाबाद, बिजारोसे, इजमाने, माराणे सांडस, शेवरे, नळकस, जुनी शेमळी, सारदे, ठेंगोडे, करंजखेड, चाफापाडा, निकवेल, मळगाव खुर्द, कोतरखेल, वाघळे, जाखोड, महड, गोराणे, माळीवाडे, गोळवाड, देवठाण दि., तळवाडे दि., श्रीपुरवडे, अ. सौंदाणे. चांदवड तालुक्यातील खेलदरी, वडबारे, मंगरुळ, नांदूरटेक, हिरापूर तर नांवगाव तालुक्यातील टाकळी खु. जळगाव खु, वाखारी, फुलेनगर, सावरगाव आदी ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणुक होणार असल्याने पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

इतर महत्वाची बातमी : 

Maharashtra: गावागावात गुलाल उधळणार; 2,359 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची तारीख ठरली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Embed widget