एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Igatpuri : इगतपुरीच्या कावनई किल्ल्यावरून दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही, ग्रामस्थांना आवाहन 

Nashik Kavnai Landslide :  इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील प्राचीन गाव असणाऱ्या कावनई येथील किल्ल्यावरून दगडी दरड (Landslide) खाली कोसळली.

Kawanai Fort :  इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील प्राचीन गाव असणाऱ्या कावनई येथील किल्ल्यावरून दगडी दरड (Landslide) खाली कोसळली. पोकळ झालेल्या भूभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आल्याने मातीचा ढिगारा खाली आला. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, तरीदेखील गावकऱ्यांनी सावध राहावे असा इशारा देण्यात आला आहे. 

राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून कालच, गुरुवारी रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडी Irshalvadi Landslide) येथे काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली. गावावरच दरड कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अशातच नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील महत्वाचा किल्ला असलेल्या कावनई किल्ल्यावरील दरड कोसळल्याची घटना घडली. पोकळ झालेल्या भुभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आली. सुदैवाने कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नसली गावकऱ्यांनी सावध राहावे असा इशारा देण्यात आला आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असा 14 शतकातील कावनई (Kavnai Fort) किल्ल्याचा काही भाग थोड्या वेळापूर्वी कोसळला आहे. किल्ल्याच्या खालच्या भागात चार पाच कुटुंबाची छोटेखानी घरे असून दैव बलवत्तर म्हणून त्यांच्यापर्यंत दरड आली नाही. सध्या दरड स्थिती स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले आहे. प्रशासनाकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना केल्या जाणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळवण्यात आले आहे. कावनई भागात पाऊस थांबला असल्याने किल्ल्यावरून पडलेली दरड पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आहे.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.... 

या घटनेची माहिती कळताच तहसिलदार अभिजित बारवकर हे अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत घटनास्थळी तातडीने रवाना झाले. प्रशासकीय अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे. तर या घटनेबाबत नाशिक पालकमंत्री दादा भुसे म्हणाले कावनाई किल्ल्याचा भाग कोसळलेला असून सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. मी स्वतः तेथील प्रांत, तहसील तसेच स्थानिक नागरिकांशी मोबाइलद्वारे बोललो असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे समजते. त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पालयट सृष्टीने उचललं धक्कादायक पाऊल
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Embed widget