(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime: नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना गुन्हेगारांचे आव्हान, दोन दिवसात खुनाच्या दोन घटना
नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणांवरून खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेतले पुढील तपास सुरू आहे.
नाशिक : नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्तलयाच्या नेतृत्वात बदल करण्यात आले आहे. नवे पोलीस आयुक्त (Police Commissioner) म्हणून संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांची नियुक्ती झाली. कर्णिक यांनी पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर दोन दिवसात खुनाच्या दोन घटना घडल्या आहे. त्यामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणांवरून खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेतले पुढील तपास सुरू आहे.
पहिली घटना
नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाचा धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे. मद्यधुंद टोळक्याने लुटमारीच्या उद्देशाने खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रविदत चौबे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वायूसेनेतून सेवा निवृत्त झालेले चौबे एका हॉस्टेलमध्ये चिफ वार्डन पदावर कार्यरत होते. कुटुंबासह जात असताना वाहनांवर दगडफेक करणाऱ्यांना हटकले असता रागाच्या भरात धारधार शस्त्राने भोसकून खून केल्याची प्राथमिक आहे. या प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.मद्यधुंद टोळक्याने लुटमारीच्या उद्देशाने खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दुसरी घटना
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. भांडणाचा राग मनात ठेवत टोळक्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला निर्जनस्थळी फेकून देण्यात आले. या प्रकरणी पोलीसांनी सात जणांना अटक केली आहे. मुलगा आठवीत शिकत होता.
नाशिकसह जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीच्या (crime) घटना घडत असल्याने जिल्ह्याचं वातावरण पूर्णतः बिघडल्याच्या स्थितीत आहे. अशातच शहरात सातत्याने गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या घटना घडत असल्याने नाशिककरांना रस्त्यावरून चालणे मुश्किल झाल्याचे चित्र आहे. दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. नागरिकांच्या पोलीस दलाविषयी नाराजी, वाढू लागली. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची अवघ्या 11 महिन्यात नाशिकहून बदली करण्यात आली. मावळ गोळीबार प्रकरणात चर्चेत आलेल्या संदीप कर्णिक यांच्याकडे नाशिकच्या कायदा सुव्यवस्थाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दभार स्वीकारताना त्यांनी नाशिकमधे कोअर पोलिसिंग करणायचे ATC सेल अधिक सतर्क करणे, गावगुंडची दहशत कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे जाहीर केले. मात्र दोनच दिवसात खूनाच्या दोन घडल्या आहे..नाशिकचा वाढता विकास, विस्ताराबरोबर गुन्हेगारी ही वाढत असल्याने नव्या दमाच्या पोलीस आयुक्तांसमोर अनेक आव्हान आहेत. त्यावर कशी मात करतात शहरातील गुन्हेगारी कशी आटोक्यात आणणार हे बघणे महत्वाचे आहे.
हे ही वाचा :