(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : कट्टा विक्री भोवली, नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला बेड्या, गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त
Nashik Crime News : शहरातील उपनगर भागात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या सराईत गुंडाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्टे आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
Nashik Crime News नाशिक : शहरातील उपनगर (Upnagar) भागात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या सराईत गुंडाला अटक (Arrest) करण्यात पोलिसांना (Nashik Police) यश आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली असून सराईत गुंडाकडून दोन गावठी कट्टे आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आले आहे. सचिन ओमचंद कागडा (25, रा. उपनगर मनपा हॉस्पिटल शेजारी, उपनगर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंमलदार प्रदीप म्हसदे, विशाल देवरे हे गस्तीवर असताना त्यांना सराईत गुन्हेगार सचिन कागडा हा उपनगर मनपा बिल्डिंगजवळ गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सराईतास अटक केली.
दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे जप्त
सराईत गुंडाची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, समाधान पवार आदींच्या पथकाने केली.
इतर महत्वाच्या बातम्या