नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
Nashik Crime News : केरळमधील 10 मुस्लीम तरुण त्र्यंबकेश्वरमध्ये आले होते. ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक : येथील त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) 10 मुस्लीम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्रह्मगिरी पर्वत (brahmagiri) परिसरात मोबाईलमध्ये हे तरुण चित्रीकरण करत आहेत. संशयास्पद हालचाली वाटल्याने स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांनी चौकशी केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ब्रह्मगिरी पर्वत परिसरात केरळमधील 10 मुस्लीम तरुण आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना आढळून आले. स्थानिक नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरुणांनी स्थानिक नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिली.
10 तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या दहा तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चौकशीसाठी त्र्यंबकेश्वरच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची आणि मोबाईलची तपासणी केली जात आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ
तरुणांनी मोबाईलमध्ये नेमके कसले फोटो काढलेले आहे आणि कसले चित्रकरण केले आहे? याबाबत तपासणी केली जात आहे. चित्रिकरणामागचा नेमका उद्देश काय आहे? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या प्रकारामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या तरुणांकडून सांगितले जात आहे की, आम्ही नेहमीच या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतो. आता पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर? याकडे सर्वांचे लक्ष लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या