Nashik Crime : नाशिकच्या निफाडमध्ये 'डबल मर्डर', मुलाकडून आईवडिलांचा खून
Nashik Crime : एका माथेफिरु युवकाने आपल्याच आई आणि वडिलांना मारहाण करीत त्यांची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे

नाशिक : एकापाठोपाठ एक खुनाच्या घटनांनी हादरलेला नाशिक जिल्हा शांत असतांना जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे एका माथेफिरु युवकाने आपल्याच आई आणि वडिलांना मारहाण करीत त्यांची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
दत्तू रामदास सुडके असे या माथेफिरू युवकाचे नाव आहे. सुडके यांच्या कुटुंबियात सातत्याने होत असलेल्या भांडणातून त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. माथेफिरु युवकाने केलेल्या मारहाणीत रामदास आणाजी सुडके आणि त्यांच्या पत्नी सरूबाई रामदास सुडके या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले आहे.
दरम्यान या डबल मर्डरच्या घटनेने निफाड तालुका हादरला आहे. घरात होत असलेल्या सततच्या वादातून आई वडील आणि मुलगा यांच्यात भांडण झाले. भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर आईचादेखील या झटापटीत मुलाने खून केला. या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ पोलीस ठाण्याची अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.संशयित मुलाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
मुलगा मनोरुग्ण
संबंधित घटनेतील मुलगा हा मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे.घरात आई वडिलांबरोबर खटके उडत होते. यातून जन्मदात्या आईवडिलांचा खून झाल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली
एकीकडे नाशिक शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असताना आता जिल्ह्यातही खुनाच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मित्राने मित्राचा खून केल्याची घटना वणी परिसरात घडली होती. आता निफाड तालुक्यातील डबल मर्डरने परिसर हादरला आहे.
संबंधित बातम्या :























