एक्स्प्लोर

Nashik: नाशिकमध्ये लाचखोरीला उधाण, कंपनीवर कारवाई न करण्यासाठी मागितली 40 लाखांची लाच, दिंडोरीच्या प्रांताधिकारी ACB च्या जाळ्यात

Nashik Bribe: नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिंडोरीच्या प्रांत अधिकाऱ्यांनी चाळीस लाखांच्या लाचेची मागणी केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. 

Nashik Bribe News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समोर आली आहे. दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांना तब्बल चाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली आहे. एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण फक्त लाचेची मागणी करण्यात आल्याने एसीबीला त्यांना अटक करण्यात अडचणी येत आहेत. एका  नाशिकमध्ये दिवसाआड लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे बुरखे फाडले जात असताना अशा प्रकारे सर्रास अधिकारी लाच घेत असल्याचे  दिसून येत आहे. 

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने लाचखोरीच्या घटना उघडकीस आणल्या जात आहेत. मागील काही दिवसांत अनेक बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. मात्र तरीदेखील लाचखोरीचा आलेख चढताच आहे. अशातच एसीबीकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. एका खासगी कंपनीची जागा एनए करून देण्यासाठी तब्बल चाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांची दिंडोरी येथे कंपनी असून त्यांच्या कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगी न घेतल्याने त्यांच्या कंपनीस प्रांत अपार यांच्याकडून नोटीस बजावण्यात आलेली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितलेले होते. सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 लाखाची मागणी केली, तसेच तडजोडी अंती 40 लाख रुपयांची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीचे दरदिवसाला एक प्रकरण समोर येत आहे. अगदी हजारापासून ते लाखो रुपयांची लाच मागणारे अधिकारी आहेत, अनेकजण लाचलुचपत खात्याच्या जाळ्यातही सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली असली तरीही रोज कुणी ना कुणी लाच मागताना समोर येत आहे आणि हे गंभीर असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान वेळोवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते. सामान्य नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही, त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget