एक्स्प्लोर

Nashik Accident News : सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, 18 जखमी

Nashik Accident News : सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Nashik Accident News : नाशिकच्या (Nashik News) सप्तशृंगी गड घाटात (Saptashrungi Gad Ghat) बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. वणी बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 18 प्रवासी होते. सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी बसचा अपघात झाला. सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. या घटनेत एक महिला जखमी असल्याचे समजते आहे. 

सप्तशृंगी गडावर ही बस मुक्कामी होती. सकाळी सप्तशृंगी गडावरून ती खामगाव ला निघालेली होती. गड उतरत असताना गणपती टप्प्यावरून बस खाली कोसळली असून तब्बल 400 फूट ती गेली आहे सध्या बसमध्ये जवळपास 15 ते 20 प्रवासी असल्याचे समजते आहे. तर या अपघातात एक महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनेची माहिती घेत ते सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले आहेत. या घटनेत किती लोक जखमी आहेत, किती मृत आहेत. याबाबतचा आकडा अद्याप समजू शकला नाही. मात्र बस थेट 400 फूट खाली कोसळल्याने हा मोठा अपघात असल्याचे बोलले जात आहे. सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामी ही बस होती आणि आज सकाळी पुन्हा ती खामगावकडे रवाना झाली होती, त्यावेळी हा अपघात झाला. 

अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही : पालकमंत्री दादा भुसे 

पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलताना सांगितलं की, "सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जी माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉईंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला. अशी प्राथमिक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तशृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना." 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Shaktipeeth Expressway : शेती वाचवा, देश वाचवा! शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार; हजारो शेतकरी एकवटले
शेती वाचवा, देश वाचवा! शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार; हजारो शेतकरी एकवटले
Star Pravah Parivar Puraskar 2024: हॅलो अशोक, मी आकाशातून जमिनीवरचा तारा बघतोय; लक्ष्मीकांत बेर्डेंचा अशोक सराफांना आभासी फोन
हॅलो अशोक, मी आकाशातून जमिनीवरचा तारा बघतोय; लक्ष्याचा लाडक्या अशोकला आभासी फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Krishna Andhale Nashik : संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात? CCTVSuresh Dhas On Satish Bhosale : सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब : सुरेश धसSatish Bhosale Arrested Photo : खोक्याला अटक झाल्यानंतरचा फोटो 'माझा'च्या हाती EXCLUSIVESanjay Raut PC : या देशात हिंदू मुस्लीम दंगली घडवण्याचा काहींचा कट : संजय राऊत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Shaktipeeth Expressway : शेती वाचवा, देश वाचवा! शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार; हजारो शेतकरी एकवटले
शेती वाचवा, देश वाचवा! शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानात एल्गार; हजारो शेतकरी एकवटले
Star Pravah Parivar Puraskar 2024: हॅलो अशोक, मी आकाशातून जमिनीवरचा तारा बघतोय; लक्ष्मीकांत बेर्डेंचा अशोक सराफांना आभासी फोन
हॅलो अशोक, मी आकाशातून जमिनीवरचा तारा बघतोय; लक्ष्याचा लाडक्या अशोकला आभासी फोन
भारतातील सर्वात स्वस्त लँड रोव्हर रेंज रोव्हरची किंमत किती?
भारतातील सर्वात स्वस्त लँड रोव्हर रेंज रोव्हरची किंमत किती?
Santosh Deshmukh Case Krushna Andhale : तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV फुटेज समोर, पाहा PHOTOS
तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? CCTV फुटेज समोर, पाहा PHOTOS
Mutual Fund : गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय वाटू लागला अनसेफ, म्युच्युअल फंडाची काळजी वाढवणारी आकडेवारी
गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय वाटू लागला अनसेफ, म्युच्युअल फंडाची काळजी वाढवणारी आकडेवारी
लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, पॉईंटेड उत्तर द्या, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न, आदिती तटकरे म्हणाल्या....
लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न,आदिती तटकरे म्हणाल्या....
Embed widget