Nashik Accident News : नांदगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात, दोन कारची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी
Nashik Accident News : नांदगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिक : नांदगाव-मनमाड रस्त्यावर (Nandgaon Manmad Road) भीषण अपघाताची (Nashik Accident News) घटना घडली आहे. दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव-मनमाड रस्त्यावरील हिरेनगर शिवारात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात झाला असून मृत व जखमी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व नाशिक जिल्ह्यातील मोहाडी या गावातील आहेत.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले
या अपघातात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर तातडीने पोलीस व आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर मालेगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृतांची नावे
- शिवाजी भास्कर देशमुख (60, रा. मोहाडी, जि. नाशिक)
- उषा नारायण महाजन (60, पाचोरा, जि. जळगाव)
जखमींचे नावे
- आशा शिवाजी देशमुख - मोहाडी, नाशिक.
- विकास शिवाजी देशमुख - मोहाडी, नाशिक.
- गयाबाई आदिक देशमुख - मोहाडी, नाशिक.
- नारायण सुकदेव महाजन - पाचोरा, नाशिक.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पावसात कारची कंटेनरला धडक, बीडच्या अंबाजोगाई-लातूर मार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू