(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पावसात कारची कंटेनरला धडक, बीडच्या अंबाजोगाई-लातूर मार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला.
बीड : बीडच्या अंबाजोगाई - लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात (Beed Accident) चार जणांचा मृत्यू झाला. पहाटे कार आणि कंटेनरमध्ये टक्कर होऊन हा अपघात घडल्याची माहिती आहे. दरम्यान स्विफ्टमधील मृत्यूमुखी पडलेले चौघे लातूरच्या चाकूर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. रात्री मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्ग्याजवळ कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून छत्रपती संभाजी नगरहून निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्ग्याजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. हा अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तीन कॉलेज तरुणांना कारची धडक, एकाचा मृत्यू
रायगडच्या नेरळमध्ये देखील अपघाताची घटना समोर आली आहे. नेरळ मधील तीन तरुण हे कॉलेजमध्ये जात असताना एका अर्टिगा कारने या विद्यार्थ्यांना धडक दिली. यामध्ये एका विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण कर्जत मार्गावरील ही घटना घडली आहे. कोकणात फिरण्यासाठी गेलेले धुरी कुटूंब हे माघारी येत असताना कल्याण कर्जत दरम्यान आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यावरून नेरळ येथील कॉलेजमध्ये पायी चालत जात असलेल्या विद्यार्थ्यांना धडकली. या धडकेत भगवान पारधी, विशाल दरोडा हे विद्यार्थी जखमी झालेत. तर मयूर पारधी या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या घटनेची अधीक चौकशी नेरळ पोलिस करत आहेत.
हे ही वाचा :