भुजबळांच्या येवला मतदारसंघात जरांगे पोहोचताच मोठा गोंधळ, अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजकांचे ढिसाळ नियोजन
Manoj Jarange Patil : छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातील भरवस फाटा येथे संत तुकाराम संगीत गाथा सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला मनोज जरांगे दाखल होताच मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
Manoj Jarange Patil : ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज नाशिकमध्ये आले असून येवला मतदारसंघात संत तुकाराम संगीत गाथा सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला जरांगे पाटलांनी हजेरी लावली.
आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात पाय ठेवताच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर तोफ डागली. त्यानंतर ते छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातील भरवस फाटा येथे संत तुकाराम संगीत गाथा सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला पोहोचले.
मनोज जरांगे पोहोचताच मोठा गोंधळ
मात्र मनोज जरांगे पाटील या सोहळ्याला पोहोचताच तिथे मोठी गर्दी झाली. यामुळे काही काळ गोंधळ उडाल्याचे दिसून आले. तर आयोजकांकडून भविकांसह माध्यमांच्या प्रतिनिधी, कॅमेरामन्सला धक्काबुक्की करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. सोहळ्याच्या आयोजकांकडून ढिसाळ नियोजन केले गेल्याची चर्चा रंगली आहे.
मनोज जरांगे-शांतीगिरी महाराज मंचावर एकत्र
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि स्वामी शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) या सोहळ्यात एकाच मंचावर मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसून आले. शांतिगिरी महाराज लोकसभेसाठी नाशिकमधून (Nashik Lok Sabha Constituency) इच्छूक आहेत. महंत स्वामी सिद्धेश्वरानंद, मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) करण गायकरही हे देखील या सोहळ्यात उपस्थित असून दोघेही लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे मंच हरिनाम सप्ताहाचा, चर्चा मात्र लोकसभा निवडणुकीची रंगली आहे.
मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका
दरम्यान, सिन्नर येथे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे. आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या असून भुजबळ किती दिवस खोटं बोलणार आहेत. मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊनच दाखवणार आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आम्ही पाडणार आहे. यांनी आम्हाला फसवलंय, असा निर्धारच मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या