एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'आम्हाला फसवलंय, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पाडणार', मनोज जरांगे पाटलांचा नाशकातून निर्धार!

Manoj Jarange Patil : किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला. आता महायुतीच्या सरकारने तेच केले, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे महाराष्ट्रभर दौरा करत आहे. आज नाशिक (Nashik) जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आले असता त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आम्ही पाडणार आहे. यांनी आम्हाला फसवलंय, असा निर्धारच मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगळे जण सारखेच आहेत. तिघांनी बनून षड्यंत्र केलंय. किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आणि आताही महायुतीच्या सरकारने तेच केले आहे. या दोघांना निवडणुकीत पाडा, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हंटले आहे. 

...तर विधान सभेला उमेदवार देणार

ते पुढे म्हणाले की, मराठ्यांनो निवडणुकीला उभ राहण्यापेक्षा यांना पाडा. यांना पाडण्यात सुद्धा विजय आहे, मला समाजाव्यतिरिक्त बाकी काहीही कळत नाही. 6 जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला उमेदवार देणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

निवडणुकीचे दोन महिने म्हणजे यांचा पोळा

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे म्हणाले की, हे दोन महिने म्हणजे यांचा पोळा आहे. यांच्यात विनाकारण जाऊ नका, फक्त मजा बघा.मराठा समाज वेळेला करेक्ट कार्यक्रम करणार आहे. टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

जरांगेंची भुजबळांवर जोरदार टीका 

निवडणुकीला उभे राहणं हा छगन भुजबळ यांचा धंदा आहे. स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे. आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या आहेत. भुजबळ आणखी किती दिवस खोटं बोलणार आहेत. तुम्ही विरोध करत राहा, मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊनच दाखवणार, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावरून  ओपनच्या मतदारसंघात हे निवडणूक का लढवतात? असा सवाल मनोज जरांगेंनी भुजबळांना विचारला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही, मग ओपन मतदारसंघातून निवडणूक का लढवता? जरांगेंनी नाशकातून भुजबळांवर डागली तोफ!

'तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू', ओबीसी नेत्याची मनोज जरांगे पाटलांना वॉर्निंग!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sahmbhuraj Desai PC : दिल्लीच्या बैठकीत काय काय घडलं? शंभुराज देसाईंनी सांगितली इनसाईड स्टोरीCity 60 | सिटी 60 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एबीपी माझा ABP Majha : 29 NOV 2024ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 29 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स-Shilpa Shetty ED Raid : अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या घरावर ईडीचा छापा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Mahayuti Oath Taking Ceremony: महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
भाजप 20, शिवसेना 12-13 मंत्रिपदं, महायुतीचा फॉर्म्युला, अजितदादांचे किती आमदार मंत्री होणार?
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Embed widget