मनोज जरांगेंच्या दौऱ्यात पुन्हा अपघात, गर्दी बाजूला करताना पायावरुन गेलं गाडीचं चाक; सभेवेळी काळजी घेण्याचं जरांगेंकडून आवाहन
सभांना गर्दी करा पण कुणाला इजा होऊ देऊ नका,काळजी घ्या, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी समर्थकांना केले आहे.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) मनोज जरांगेचे (Manoj Jarange) सहकारी आप्पासाहेब कुढेकर यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. कुढेकर हे जरांगेंसोबत दौऱ्यादरम्यान कायम असतात. सभेसाठी जात असताना त्र्यंबकेश्वरला पोहचल्यावर हा अपघात झाला. सुरुवातीला त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अधिक उपचारासाठी नाशिकला हलविले. कुढेकर यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सभा संपवून जरांगे कुढेकरांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहचले. कुढेकरांच्या अपघातानंतर मनोज जरांगेंनी आवाहन करण्यात आले आहे. सभांना गर्दी करा पण कुणाला इजा होऊ देऊ नका,काळजी घ्या, असे आवाहन मनोज जरांगेंनी समर्थकांना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांचा ताफा त्रंबकेश्वरमध्ये दाखल झाल्यानंतर मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी जमा झाली होती. गर्दी बाजूला करत असताना आप्पासाहेब कुढेकर यांच्या डाव्या पायावरून गाडीचे चाक गेल्यानं जखमी झाले आहेत. सुरुवातीला त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.त्यानंतर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार करून कुढेकर यांना सभाजीनगरला नेण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे. मनोज जरांगे पाटील यांनी रात्री त्र्यंबकेश्वरची सभा आटोपती घेऊन नाशिकच्या रुग्णलयात जाऊन जखमी कुढेकर यांची विचारपूस केली. डॉक्टरच्या सल्ल्याने संभाजी नगरला हलविण्याचा निर्णय घेतला, यावेळी त्यांनी सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
सभांना गर्दी करा पण कुणाला इजा होऊ देऊ नका, जरांगे पाटलांचे आवाहन
जरांगे पाटील म्हणाले, सर्व मराठ्यांना 23 डिसेंबरच्या आत ओबीसीमधून आरक्षण मिळणार आहे. आतापर्यंत 32 लाख नोंदी झाल्या आहेत. आरक्षण 70 वर्षाअगोदर मिळाले असते तर आज मराठा जात एक नंबरची जात मराठा ठरली असते. तुम्ही मोठ्या संख्येने जमला मात्र गर्दीच्या नादात चूक होऊ देऊ नका. आपल्या बांधवाला काही होऊ देऊ नका, कोणाला इजा होऊ देऊ नका.
मी थांबले तर सर्व थांबेल : मनोज जरांगे
मला डॉक्टरांनी लिव्हरवर सूज असल्याचे सांगितले. माझं शरीर मला आता झेपत नाही, माझं शरीर मला साथ देत नाही. डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितले. पण मी थांबले तर सर्व थांबेल, आरक्षण अंतीम टप्यात आले आहे. मला आज तुम्हला लोटावे लागले, मी तुमच्या भरवसावर लढत आहे, असे मनोज जरांग म्हणाले.
हे ही वाचा :