एक्स्प्लोर

नाशिककरांनो! लाडकी बहिण योजनेचा फायदा घ्यायचाय? 'असा' भरा घरबसल्या अर्ज, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिकमधील महिलांची सेतू कार्यालयासह इतर तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

नाशिक : महायुती सरकारने (Mahayuti Government) नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात नुकतीच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली होती. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर लाभासाठी नाशिकमधील महिलांची सेतू कार्यालयासह इतर तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. मात्र आता योजनेसाठी घरबसल्या अर्ज दाखल करता येणार आहे. या योजनेसाठी कुठली कागदपत्र लागणार? मोबाईलवर अर्ज कसा भरणार? याची माहिती जाणून घेऊयात... 

घरबसल्या मोबाईलवर 'असा' भरा अर्ज

  • गुगलच्या प्ले स्टोअरवरून 'नारीशक्ती दूत' ॲप डाऊनलोड करा.
  • 'नारीशक्ती दूत' ॲप ओपन करा. 
  • तुमचा मोबाईल नंबर, ओटीपी  आणि टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करून लॉगिन करा. 
  • तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, गृहिणी, ग्रामसेवक या गोष्टी भरून प्रोफाईल अपडेट करा.  
  • नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय निवडा.
  • अ‍ॅप्लीकेशनला लोकेशनची परमिशन द्या.  
  • तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल.
  • आधार कार्डवरील संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचा गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची सविस्तर माहिती भरा.
  • तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
  • वैवाहिक स्थिती काय आहे त्याबाबत माहिती टाका. 
  • लग्नाआधीचे संपूर्ण नाव नमूद करा. 
  • तुमचा जन्म परप्रांतात झाला असेल हो निवडा. आणि जर महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा. 
  • आता बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. त्यात अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी क्रमांक, आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरा. 
  • त्यांनतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत.  
  • त्यात आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, अर्जदाराच्या हमीपत्र, बँक पासबुक, आणि महिलेचा जन्म जर पर प्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे. हमी पत्राचा अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाऊनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढून तुम्हाला ते हमीपत्र फॉर्म भरायचे आहे.
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराच्या फोटोचा ऑप्शन आला असेल.
  • या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे. 
  • फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली "Accept हमीपत्र डिस्क्लेमर" यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहे याची माहिती आली असेल. आता तुम्हाला ते एक्सेप्ट करायचे आहे. 
  • त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटन वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका. 
  • या पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरबसल्या मोबाईलवर भरू शकता. 

आणखी वाचा 

सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत;  प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
मोठी बातमी: पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
विठुराया-वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय आर्थिक गर्तेत, हस्तकलेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विठुराया-वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय मरणासन्न अवस्थेत, हस्तकलेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chembur Heavy Rain Swami Vivekanand school : चेंबरच्या स्वामी विवेकानंद शाळेत पाणी शिरलंThane Mumbai Rain : ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, बस नसल्यान प्रवासी खोळंबलेHarbar Railway line Heavy Rain : पनवेल ते वाशी रेल्वे वाहतूक सुरू, वाशी ते सीएसएमटी बंदDombivali Platform Crowd : ट्रेनचा खोळंबा, डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तोबा गर्दी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत;  प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
मोठी बातमी: पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
विठुराया-वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय आर्थिक गर्तेत, हस्तकलेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विठुराया-वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय मरणासन्न अवस्थेत, हस्तकलेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Embed widget