Dr.Bharti Pawar : आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती होणार, कल्पनाच केली नव्हती, मंत्री भारती पवारांचे गौरवाद्गार
Dr.Bharti Pawar : आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती (President) झाली. आम्ही तर कल्पनाच केली नव्हती, अशी भावनिक प्रतिक्रया मंत्री भारती पवार (Minister Dr. Bharti Pawar) यांनी दिली.
Dr. Bharti Pawar : आजचा दिवस ऐतिहासिक असून सोनेरी अक्षरांनी लिहला जावा असाच आहे. एक आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती (President) झाली. आम्ही तर कल्पनाच केली नव्हती. त्यांचं नाव जेव्हा नॉमिनेट झालं तेव्हा खरंच आमच्यासाठी ते खूपच अचंबित करणार होत अशी भावनिक प्रतिक्रया मंत्री भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली.
नुकत्याच भारताच्या राष्ट्रपतिपदी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांची प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली. या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असून भारताच्या दुसऱ्या महिला आहेत. मुर्मू यांचीराष्ट्रपती पदी निवड झाल्यानंतर देशभातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. या निवडीबाबत दिंडोरीच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री डॉ. भारती पवार या प्रतिक्रिया देताना भावनिक झाल्या.
यावेळी डॉ. पवार म्हणाल्या, एक आदिवासी महिला आता राष्ट्रपती भवनात पोहोचलेली आहे. द्रौपदी मुर्मू यांचा इतिहासच वाचण्यासारखा आहे. त्या व्यक्तीने अतोनात संघर्ष केला आहे. ती व्यक्ती समाजसेवेसाठी आणि भारत मातेच्या सेवेसाठी किती समर्पित आहे, हे त्यांच्या संघर्षांवरून लक्षात येते. खरंच निकाल आला आणि एक ऐतिहासिक निर्णय, सोनेरी क्षण आणि एक आदिवासी समाजाची आमची माता राष्ट्रपती होणार, कधी आम्ही कल्पनाच केली नव्हती. म्हणजे त्यांचं नाव जेव्हा नॉमिनेट झालं तेव्हा खरंच आमच्यासाठी ते खूपच अचंबित करणार होते. कारण बघा स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षानंतर सुद्धा आज आपण अमृत कालामध्ये आहोत तर एक आदिवासी समाजाला एवढं सर्वोच्च स्थान मिळेल हे खरच आम्ही कधी विचारही केला नसल्याचे त्या म्हणाल्या.
आदिवासी समाजाची मुलगी म्हणून आनंद
भारताच्या राष्ट्रपतिपदी आज एक आदिवासी महिला विरजण झाली आहे. त्यामुळे आदिवासी समाजाची मुलगी म्हणून मी तर म्हणेन की आमच्यासाठी कालचा दिवस खूपच ऐतिहासिक होता, अविस्मरणीय होता आणि त्या क्षणाच्या आम्ही सगळे साक्षीदार आहोत याचा आनंद आहे. प्रधानमंत्री मोदींनी हा जो निर्णय घेतला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हे सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यांनाच याच्यामध्ये न्याय दिला जावा या हेतूने हा निर्णय झाला आहे. सगळ्या समाजाला न्याय देत असताना आदिवासी समाजाला पण हा मोठा न्याय मिळालेला आहे.
मतदानात राजकारण आडवा येतं!
केवळ भाषणांमध्ये सांगायचं की आदिवासी समाजाला पुढे आणलं पाहिजे, विकास केला पाहिजे परंतु जेव्हा प्रत्यक्षात एक आमची माता तिथे सर्वोच्च पदावर जाते. तेव्हा खार न्याय दिल्यासारखे होते. मात्र अनेकदा राजकारण आडव येतं आणि मतदान केलं जात नाही, आदिवासी समाज हे सगळं बघतो आहे आणि कुठेतरी सर्वोच्च पदावर जात असताना राजकारण केलं जाऊ नये हे आधी सुद्धा पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं. हि निवडणूक काय राजकीय नव्हती, किंवा आखाडा नव्हता परंतु तिथे सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागत असल्याची खंत डॉ. भारती पवारांनी बोलून दाखवली.