(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : सप्तशृंगीगडाच्या घाटात देवी संस्थानच्या सुरक्षारक्षकाचा खून, नाशिक ग्रामीण पोलिसांचा तपास सुरु
Nashik Crime : सप्तशृंगी देवी (Saptshrungi Gad) संस्थानमध्ये सुरक्षारक्षकपदी कार्यरत असलेल्या युवकाचा मृतदेह (Youth Murder) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध सप्तशृंगी गडाकडे (Saptshrungi Gad) जाणाऱ्या घाटात युवकाचा मृतदेह (Youth Murder) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा तरुण सप्तशृंगी देवी संस्थानमध्ये सुरक्षारक्षक पदी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सप्तशृंगी गडाच्या घाटात सुरक्षा रक्षकाचा खून झाल्याने सप्तशृंगी गड परिसरात खळबळ उडाली आहे. सप्तशृंगी गडावर जात असताना घाटाच्या मध्यभागी असलेल्या धबधब्याजवळ रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला. सप्तशृंगडावर जाणाऱ्या भाविकांच्या हि बाब निदर्शनास आली. यानंतर या घटनेची पोलिसांपर्यंत पोहचली. पोलिसांचा प्राथमिक तपासात सप्तशृंगी देवी संस्थान येथे सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत होता असे आढळून आले.
पोलिसांचा माहितीनुसार सप्तशृंगीगड ते नांदुरी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात एक युवक पडलेल्या अवस्थेत दिसून आल्याची माहिती दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी दिली. भाविकांनी लागलीच याबाबत सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टला माहिती दिली. येथील न्यास प्रशासनाने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवून वरिष्ठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व यानंतर पंचनामा करण्यात आला. अर्जुन पवार असे या युवकाचे नाव असून तो सप्तशृंगी देवी मंदिर संस्थानचा सुरक्षा रक्षक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी अज्ञात विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सप्तशृंगी गडावरील नागरिक भयभीत झाले आहे.
अर्जुन पवार हा इसम सप्तशृंगी गडाचा स्थानिक रहिवासी असून सप्तशृंगी देवी ट्रस्ट येथे सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असून काही वर्षांपासून सासरवाडी राहण्यासाठी कळवण तालुक्यातील भेंडी या ठिकाणी राहत होता. मात्र रात्री ९ वाजेचा सुमारास सप्तशृंगी देवी संस्थान येथे रात्री ड्युटीसाठी येण्याच्या दरम्यान सप्तशृंगी गडाचा घाटात हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेमुळे सप्तशृंगी गडावर खळबळ उडाली असून अधिक तपास कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरिक करीत आहेत.
सप्तश्रुंगी गडावर ढगफुटी
नाशिक शहरासह जिल्ह्यात सहा दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर सह सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस कायम आहे. तर काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी गडावर अचानक ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली होती. यात सहा ते सात भाविक जखमी झाले होते. यानंतर हे मंदिर पुढील दीड महिन्यांसाठी बंद करण्यात आले आहे.