(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha Election 2022 : म्हणून निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं!
Rajya Sabha Election 2022 : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांचे मत बाद ठरवल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नेमकं कांदे यांचे मत बाद का ठरविण्यात आले?
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेची निवडणूक नाट्यमय रित्या पार पडली. अतिशय चुरशीच्या या निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडी घडली. यात विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नेमकं आमदार सुहास कांदे यांचे मत बाद का ठरविण्यात आले हे पाहुयात.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून, भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. त्यामुळे भाजपकडून तिन्ही उमेदवार विजयी झाल्याच्या निमित्ताने राज्यभर जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र या सर्व काळात अनेक नाट्यमय घडामोडी समोर आल्या. यामध्ये आमदार सुहास कांदे यांचं महत्वाचं असलेले मत बाद ठरविण्यात आले. शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या दोघांची मते वैध ठरवली याशिवाय विरोधकांनी अक्षय घेतलेल्या भाजपचे सुधीर मुनगंटीवार व अपक्ष आमदार रवी राणा यांचे मते वैध ठरवण्यात आली.
मत बाद करण्याचे कारण?
निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचे मत बार ठरवतांना जो निकष लावला तो असा की न दुमडलेली मतपत्रिका घेऊन कांदे फिरत होते. ती इतरांनाही दिसल्याने नियमाचे उल्लंघन झाले. त्यामुळे त्यांचे मत बाधक ठरते. शेवटी मतमोजणी करताना आमदार सुहास कांदे यांची मतपत्रिका बाजूला ठेवून मतमोजणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले
अकरा तासानंतर निकाल
दरम्यान शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणल्या गेलेल्या आणि अतिरिक्त मतांच्या मुठी अधिकाधिक घट्ट झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेच्या आवारात सकाळी मतदानास सुरूवात झाली. सर्व पक्षांतर्फे कडेकोट बंदोबस्तात आमदार दाखल झाले, मात्र दुपारनंतर तांत्रिक मुद्द्यावरून मतदान केंद्र राजकारणाचे व्यासपीठ बनले. आकड्यांचे खेळ आणि राजकीय डावपेचांनी रंगलेल्या राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांची निवडणूक प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी थरारक राहिली. महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजप पोहोचते. यानंतर तब्बल अकरा तासांपेक्षा अधिक काळ लोटून गेल्यावर ही निवडणूक आयोग मतमोजणीचा निर्णय जाहीर करू शकला नव्हता. दरम्यान रात्री एकच्या सुमारास आयोगाने अखेर निर्णय जाहीर केल्यानंतर निकाल देण्यात आला.