(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : एखादा बॉम्ब पडावा, असा सुप्रीम कोर्टाचा निकाल, छगन भुजबळ संतप्त
Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणा (OBC Election) बाबत एखादा बॉम्ब पडावा असा निर्णय न्यायालयाने (Supreme Court) दिलेला असल्याचे मत माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.
Chhagan Bhujbal : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Election) जाहीर झाले असले तरी आज न्यायालयाने दिलेला निर्णय हा धक्कादायक असल्याचे मत माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.
छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) आले असून आज त्यांनी भुजबळ फार्म येथे पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भांत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर बोलताना भुजबळ म्हणाले की, न्यायालयाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना ओबीसी आरक्षण जाहीर केले आहे. परंतु त्यावेळी ज्या नगरपालिका व नगरपंचायतीचे फार्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, त्या ठिकाणच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाने घ्यायच्या असे सांगितले होते.
मात्र आता सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे धक्काच असल्याचे भुजबळांनी सांगितले. तत्पूर्वी ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर ढोल ताशे वाजविण्यात आले. महिलांनी आनंदोत्सव, पेढे वाटले. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबाबत मुंबईहून निघाल्यानंतर माहित झाले, आश्चर्य वाटले.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की एवढ्या वर्षाच्या आंदोलनाला यश आले. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्यावेळी ओबीसी म्हणून आनंद झाला. मात्र सध्या अनेक निर्णय उलट सुलट होत आहेत. पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आमच्यापासून हिरावून घेतले. ओबीसी आरक्षण आम्हाला द्यायलाच पाहिजे, म्हणजे तो आमचा हक्क आहे, पार्लमेंटने मान्य केला आहे, प्रश्न येतो कुठे चर्चांचा, असा सवालही यावेळी भुजबळांनी उपस्थित केला.
रीपिटीशन दाखल करणार
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. निवडणूक आयोग व उपमुख्यमंत्री यांना री पिटीशन दाखल करण्यास सांगितले आहे. तसेच अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने आम्हीही री पिटीशन दाखल करणार असल्याचे भुजबळांनी सांगितले.
बॉम्ब पडावा असा निकाल
सदरचा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक असून आमच्या वाट्याचा संघर्ष अजून संपलेलाच नाही. अतिशय गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, सगळे निर्णय उलट सुलट होत आहे. आज अचानक एखादा बॉम्ब पडावा असा निकाल देण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्य मंत्र्यांनी याबाबत सगळी शक्ती एकवटून काम केले पाहिजे, खानविलकर यांनी दिला, ते उद्या रिटायर्ड होत आहेत.
ओबीसी नेत्यांनी बोललं पाहिजे!
नाशिकमध्ये ओबीसी मेळाव्यात बावन कुळें यांनी ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीवर आगपाखड केली. या संदर्भांत भुजबळ म्हणाले की, बावनकुळे आमचे मित्र आहेत, त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी काम केले आहे.. त्यांनीही आवाज उठवला.. ज्या ज्या पक्षांमध्ये ओबीसी नेते आहेत, त्यांनी याबद्दल बोलले पाहिजे, ते काम त्यांनी काही प्रमाणात केले आहे. हे सगळे निर्णय घेताना मुख्यमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतले जातात. त्यांनी हा केले म्हणून बाठिया कमिशन नेमले गेले. प्रयत्न सर्वांनी केले, काहींनी कमी केले तर काहींनी जास्त केले. ओबीसी आरक्षणासाठी साठी सर्वांनी हातभार लावला.
मंत्रिमंडळ विस्तारावर ते म्हणाले...
राष्ट्रपतींची निवडणुकीमुळे मंत्री मंडळ विस्तार लांबणीवर पडत असल्याचे दिसते आहे. यासोबत अनेक करणे असू शकतात, मात्र वेळ होतो आहे, हे खरे आहे. सध्या अनेक भागात पूर आल्याने शेतीचे नुकसान, रस्त्यांची दूरावस्था आहे, महागाई, जीएसटी, पावसाचा कहर असून अशावेळी मंत्री मंडळामध्ये अधिक मंत्र्यांची आवश्यकता असायला हवी होती. म्हणजे राज्यात लक्ष केंद्रित झाले असते, मात्र उशीर होतो आहे, हे खरे आहे.
शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा
छगन भुजबळ यावेळी शरद पवार यांच्या दौऱ्याविषयी म्हणाले, शरद पवार धुळे येथे कार्यक्रम असल्याने नाशिक येथे येणार आहेत. ते दिल्ली वरून शिर्डीला येणार असून तिथून मग नाशिक येथे मुक्कामी येतील. परवा सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यानंतर पुन्हा नाशिक शिर्डी व दिल्ली येथे जाणार आहेत. तर शिंदे यांचा दौरा हा जिथे जिथे शिवसेनेचे आमदार शिंदे गटात गेले आहेत, तिथे लक्ष देणे आवश्यक असल्याने त्यांचा दौरा असणार आहे. शिवाय त्यांची नाशिक शहरावर नजर असून त्या दृष्टीनेच त्यांनी महानगर आयुक्तांची बदली केली असल्याचे भुजबळांनी सांगितले.