Nashik: अजित पवार अस्वस्थ, त्यामुळे काहीही होऊ शकतं, दादा भुसे यांचे सूचक वक्तव्य
Dada Bhuse on Ajit Pawar : वरिष्ठ पातळीवर काही गोष्टी सुरू आहेत, त्या मला माहिती नाहीत असं राज्याचे मंत्री दादा भुसे म्हणाले.
नाशिक : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संदर्भात सध्या राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत, यावर राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. याबाबत मला माहीत नाही, वरिष्ठ पातळीवर काही गोष्टी सुरू आहेत, मात्र अजितदादा अस्वस्थ आहेत, त्यामुळे काहीही होऊ शकत असं सूचक वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केले.
राज्याचे मंत्री दादा भुसे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज नाशिक शहरात आले होते. सकाळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, उत्साहाचे वातावरण आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शुभेछा नाशिककरांना दिल्या आहेत.
दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त इंदू मिलवरील डॉ. आंबेडकर स्मारकासंदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, येत्या वर्षभरात इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. यावर दादा भुसे म्हणाले की, बाबासाहेबांचं स्मारक व्हावं ही सगळ्यांची मागणी आहे. मागच्या काळात ते काम सुरू झालं. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी त्या कामाची पाहणी केली. मला वाटतं लवकरच ते काम पूर्ण होईल, असेही दादा भुसे म्हणाले.
दादा भुसे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर म्हणाले की, हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. बालिशपणा आहे असे मला वाटते. जेव्हा झालं, त्याच वेळी बोलायला हवं होत. ही राहुल गाधी स्टाईल आहे. ते बाहेर जाऊन देशाची बदनामी करत आहे. हा सगळा संगतीचा परिणाम आहे. सोबत महाविकास आघाडीच्या संगतीचा परिणाम आहे. विकासाची काम होत आहे म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मात्र विकासावर बोलायला तयार नाही. शिवसेना हा तळागाळात जाऊन काम करणारा पक्ष असल्याचे भुसे म्हणाले.
त्यामुळे काहीही होऊ शकतं...
तर अजित पवार यांच्यावर बोलताना दादा भुसे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या संदर्भांत ज्या चर्चा सुरू आहेत त्याबाबत मला माहीत नाही. वरिष्ठ पातळीवर या गोष्टी सुरू आहे. मला तर अस वाटतंय की अजित दादा अस्वस्थ आहेत. त्यामुळे आगामी काळात काहीही होऊ शकते.
ही बातमी वाचा: