एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये अडीच तासांची शस्रक्रिया, दुर्मिळ कासवाला मिळाली नवसंजीवनी

Nashik News : नाशिक (Nashik) दरी मातोरी गावाजवळ जखमी झालेल्या कासवावर (Turtle) अडीच तासांच्या शस्रक्रिया करण्यात आली असून योग्य उपचारामुळे कासव रिकव्हर होण्यास मदत झाली आहे. 

Nashik News : नाशिक (Nashik) शहर परिसरातील दरी मातोरी गावाजवळ शेत नांगरत असताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये (Tractor) सापडल्याने दुर्मिळ कासव जखमी झाले होते. मात्र इको एको आणि शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून या दुर्मिळ कासवाला (Rare Turtle) नवसंजीवनी मिळाली असून योग्य उपचारामुळे कासव रिकव्हर होण्यास मदत झाली आहे. 
 
जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीचा पाऊस झाला. यानंतर मशागत, भातलावणी, नांगरणी या शेती कामांना वेग आला. याच दरम्यान (दि.23जुलै) रोजी दरी मातोरी परिसरात शेतकरी शेतीची मशागत करत असताना त्याचवेळी ट्रॅक्टरच्या रोटारोव्हरखाली दुर्मिळ जातीचे कासव अडकून असल्याचे दिसले. यावेळी शेतकऱ्याने तातडीने काम थांबवून कासवाला बाहेर काढले. कासवाच्या पाठीवरील कवचास जखम झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ इकोएको फाऊंडेशनला याबाबत माहिती दिली. 

दरम्यान इको एको फाउंडेशनचे (Eco Echo Foundation) वैभव भोगले यांनी तात्काळ घटनास्थळ गटातून जखमी कासवास ताब्यात घेतले. यानंतर जखमी कासवास प्राथमिक उपचारासाठी शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी सचिन वेंदे आणि डॉ.संदिप पवार यांनी जखमीवर तब्बल दोन तास यशस्वी शस्त्रक्रिया केली. गेल्या आठ दिवसांपासून दुर्मिळ कासवावर उपचार सुरु असून सद्यस्थितीत हे कासव हालचाल करू लागले आहे. तसेच कासव हे उपचारांना त्याने चांगला प्रतिसाद दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

पण कासव शेतात कसे?
नाशिक शहर परिसर नैसर्गिक दृष्टया जैवविविधतेने परिपूर्ण आहे. त्यामुळे नाशिक शहराच्या आजूबाजूला अनेक वन्यप्राणी आढळून येतात. दरम्यान सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. अशातच पावसाळ्यात, मादी कासव सहसा अंडी घालण्यासाठी बाहेर पडते. शेतात प्रवेश करण्यासाठी रस्ता ओलांडतात. ही कासवे सहसा नदीकाठी दिसतात. सरपटणारे प्राणी दुर्मिळ श्रेणीत असले तरी नाशिक जिल्ह्यात या प्रजातींची संख्या अधिक आहे. तसेच, ते रात्री बाहेर पडतात. त्यामुळे असे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेग मर्यादेत वाहन चालवावे, असे आवाहन इको इको फाउंडेशनचे सदस्य  वैभव भोगले यांनी केले आहे. 

दुर्मिळ प्रजाती 
शेतात आढळलेले कासव हे Leiths Soft Shell Turtle या प्रजातीचे असून कासवाची हि प्रजाती दुर्मिळ असून इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या धोक्यात असलेल्या प्रजातींपैकी एक आहे. प्रजातींची यादी आणि त्यांची स्थिती बघता जैवविविधता संवर्धन आणि धोरणातील बदलासाठी कृती करण्याची गरज आहे. यादी नऊ श्रेणींमध्ये प्रजातींची विभागणी करते: मूल्यमापन न केलेले, डेटाची कमतरता, किमान चिंताजनक, जवळपास धोक्यात, असुरक्षित, धोक्यात, गंभीरपणे धोक्यात, जंगलातील नामशेष आणि नामशेष. एक IUCN रेड लिस्ट क्रिटली एन्डेंजर्ड प्रजाती म्हणजे जंगलात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती होय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
Embed widget