(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : 'उलगुलान जारी है, जारी रहेगा', नाशिकमध्ये आदिवासी भवनसमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nashik News : नाशिकच्या आदिवासी भवन समोर हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत उलगुलान आंदोलन पुकारले.
Nashik News : आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली पंडित दीनदयाल स्वयंम योजनेत वाढलेली दहा ते बारा हजार रुपयांनी वाढ करण्यात यावी. तसेच याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी एक महिन्यात शिष्यवृत्ती जमा करावी अशा अनेक मागण्यांसाठी आज नाशिकच्या (Nashik) आदिवासी भवन (Adivasi Bhawan) समोर हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत उलगुलान आंदोलन पुकारले.
आदिवासी विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले असून मोठ्या संख्येने आदिवासी विकास भवनाला त्यांनी घेराव घातला आहे. राज्याचे मुख्य आदिवासी विकास भवन असलेले 'नाशिक' येथील आदिवासी विकास भवनाला आज सोमवारी सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी (student Agiataion) घेराव घालत उलगुलान आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक झाले असून जवळपास तीनशेहून विद्यार्थी आंदोलनात उपस्थित आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी हातात विविध फलक घेऊन शांतपणे आपल्या मागण्या प्रशासनांसमोर मांडल्या.
दरम्यान अखिल भारतीय महाराष्ट्र आदिवासी विकास परिषदचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकी विद्यार्थ्यांनी केला. नाशिक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वाढीव वस्तीगृह सुरू करून यामध्ये 500 मुलांची व 300 मुलींची क्षमता असलेल्या प्रवेश संख्या वाढवण्यात यावी. पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तसेच डीबीटी लागू करण्यासाठी, होस्टेलमध्ये वाढीव जागा मिळण्यासाठी तसेच अनेक विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा या विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. आदिवासी भवनसमोर गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं.
या मागणीसाठी आंदोलन...
मागील काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड स्पष्ट दिसत असून आता हे विद्यार्थी आक्रमक झाले आहते. आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली पंडित दीनदयाल स्वयंम योजनेत वाढलेल्या महागाईमुळे दहा हजार ते बारा हजार रुपयांनी वाढ करण्यात यावी, याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाविद्यालयानी एक महिन्यात शिष्यवृत्ती जमा करावी अशा अनेक मागण्यांसाठी आज नाशिकच्या आदिवासी भवन समोर हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत उलगुलान आंदोलन पुकारले.