एक्स्प्लोर

Nashik Pik Vima : विमा समन्वयक नाही, कार्यालय नाही, पीक विमा काढू कसा? नाशिकच्या शेतकऱ्यांची तारांबळ 

Nashik Pik Vima : गेल्या दहा दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यास सुरवात झाली आहे.

Nashik Pik Vima : गेल्या दहा दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा (Crop Insurance) काढण्यास सुरवात झाली आहे. मात्र कंपन्यांकडून पुरविण्यात आलेल्या पोर्टलवर अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यास उशीर होत असून शेतकऱ्यांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशातच कंपनीकडून कोणताही विमा समन्वयक नेमण्यात न आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. मागील दहा दिवसांत जिल्ह्यातील 11 हजार 929 शेतकऱ्यांची पीक विम्याची नोंद झाली आहे.

संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची महत्वाकांक्षी अशी पिक विमा योजना सुरू (Crop Insurance Scheme) आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात विमा काढून देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक जिल्ह्यामध्ये टेंडर पद्धतीने अनेक इन्शुरन्स कंपन्यांना टेंडर दिले गेले आहे. त्यात नाशिक जिल्ह्याचे टेंडर हे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला गेले आहे, मात्र या कंपनीकडून अद्यापही शेतकऱ्यांना योग्यरित्या मार्गदर्शन केले गेले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

गेल्या 1 तारखेपासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे. परंतु नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ज्या कंपनीची नेमणूक केली आहे. त्या कंपनीकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची पीक विमा योजनेची जाहिरात अथवा शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर असे उपक्रम राबविण्यात आले नसून यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढावा कसा? कोणती कागदपत्रे लागतात? किंवा अर्ज कुठे आणि कसा करावा याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना पोर्टलवर बऱ्याच अडचणींचा सामना देखील करावा लागत आहे. पोर्टलवर अर्ज भरताना शेतकऱ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या अडचणींसाठी प्रत्येक तालुक्याला पिक विमा योजनेचे तालुका समन्वयक तसेच तालुक्याला कार्यालय देखील असते. अद्यापपर्यंत टेंडर होऊन इतके दिवस झालेले असताना देखील कुठल्याही प्रकारचे कार्यालय अथवा समन्वयकाची भूमिका निभावणारा प्रतिनिधी देण्यात आलेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

विशेष म्हणजे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदार संघात अशी परिस्थिती असल्याने यास जबाबदार कोण असा देखील प्रश्न सामान्य शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रश्न तसेच अडचणीना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शासनाने वरिष्ठ स्तरावर गरजेचे असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. पीक विमा काढण्यासाठी गेलो असता आपले सरकार केंद्रावरती पीक विमा योजनेची कुठलीही माहिती लावलेली नव्हती. तसेच ऑनलाईन अर्ज करताना अनेक अडचणी आल्या. यासाठी वारंवार कृषी अधिकाऱ्यांना कॉल करणे भाग पडत होते. अखेर बऱ्याच कालावधीनंतर अर्ज भरला गेला. परंतु अशा अडचणी शेतकऱ्यांना येऊ नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

अर्ज भरताना पोर्टलवर अडचणी 

दरम्यान दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथील व्हीएलए केंद्र चालक दिंगबर राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा अर्ज करताना कंपनीच्या पोर्टलवर अनेक अडचणी येत आहेत. कंपन्यांकडून विमा समन्वयक नेमण्यात आला नसल्याने याबाबत कुणाशी चर्चा करावी, असा प्रश्न उपस्थित होतो, असे ते म्हणाले. त्यामुळे मागील 1 जुलै पासून पीक विमा अर्ज करण्यास सुरवात झाली असताना नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांचा पीक विमा काढला गेला नसल्याचे समोर आले आहे.  

अशी आहे जिल्ह्यातील आकडेवारी 

दरम्यान आज दहा दिवसांची आकडेवारी पाहिली असताना सर्वाधिक शेतकऱ्यांच्या पीक विम्याची नोंद  मालेगाव तालुक्यात झाल्याचे दिसून येत आहे. मालेगाव 3446, बागलाण 837, चांदवड 740, देवळा 504, दिंडोरी 23, इगतपुरी 693, कळवण 133, नांदगाव 1967, नाशिक 14, निफाड 338, पेठ 334, सिन्नर 323, सुरगाणा 1054, त्र्यंबकेश्वर 341, येवला 1182 अशा जिल्ह्यातील एकूण 11 हजार 929 शेतकऱ्यांची पीक विम्याची नोंद झाली आहे.

Pik Vima : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करा, कृषी आयुक्त सुनिल चव्हाणांचे शेतकऱ्यांना आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget