Sanjay Raut : ... म्हणून मागच्या पंचवार्षिकला गोडसेंना तिकीट दिल...संजय राऊतांनी सांगितला किस्सा!
Sanjay Raut : संजय राऊत यांनी गोडसेंना मागच्या पंचवार्षिकला तिकीट देण्याचे कारणंही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
Sanjay Raut : खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात खडाजंगी सुरूच असून आज नाशिकमध्ये (Nashik) संजय राऊत आले असता गोडसेंचा विषय निघाला. त्यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी गोडसेंची फिरकी घेत साधा शिवसैनिक (Shivsanik) देखील त्याला हरविणार अशी ग्वाही यावेळी दिली. त्याचबरोबर मागच्या पंचवार्षिकला तिकीट देण्याचे कारणंही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार वॉर सुरु होते. हे वॉर शमविण्यासाठी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नाशिकमध्ये (Nashik) येईन शिंदे गटाची हवा टाईट केली होती. त्याचबरोबर हेमंत गोडसेंना निवडणुकीला उभं राहण्याचे चॅलेंज दिले होते. हे चॅलेंज देखील गोडसेंनी स्वीकारले होते. मात्र आज पुन्हा संजय राऊत हे नाशिकमध्ये आले असता त्यांनी खासदार हेमंत गोडसे हा शिवसेनेचा चेहरा कधीच नव्हता, असे ते म्हणाले. मागच्या नाशिक लोकसभा निवडणूक दरम्यान किस्सा सांगत संजय राऊत यांनी गोडसेंची एंट्री कशामुळे झाली याचे कारण सांगितले. पण आता नाही, आता इथं बसलेला कोणीही निवडणूक लढवू शकतो, साधा शिवसैनिक गोडसेला पाणी पाजल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
संजय राऊत हे नाशिकमध्ये असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी हेमंत गोडसे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी मागील पंचवार्षिक निवडणूक तिकीट देण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, त्यावेळी गोडसे यांना शिवसेनेतून प्रचंड विरोध होता. नाशिक लोकसभा मतदारसंघातुन, तालुक्यातुन विरोध होता. मात्र तिकीट कापणे योग्य नव्हते, ते मातोश्रीवर आले, त्यांनी चुका दुरुस्त करू असे म्हणाले. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट दिले, तेव्हा पक्षाचा निर्णय होता, पक्षाचा निर्णय कधी लादला जात नाही, यावेळी पक्ष बसून निर्णय घेईल. नाशिककर यावेळी चेहऱ्याला नाहीतर शिवसेनेला मतदान करतील, त्यामुळे इथं बसलेला कोणीही निवडणूक लढवू शकतो, आम्ही कशाला पाहिजे. मच्छराला मारायला आमची गरज नाही. आमच्या विजय करंजकरने एका फवारणी केली कि सुफडासाफ होईल. शिवाय साधा शिवसैनिक सुद्धा हरवू शकतो, असे ते म्हणाले.
गोडसेंना साधा शिवसैनिक हरवू शकतो...
ते पुढे म्हणाले, जिल्हा प्रमुख हा पक्षाचा सेनापती असतो. त्याला कास लढायचं हे माहिती असत, त्याला शिकवायची गरज पडत नाही. विजय करंजकर, सुनील बागुल अशी लय मोठी फळी असून गोडसेंना साधा शिवसैनिक हरवू शकतो, असे ते म्हणाले. त्यामुळे कोणीही कुठे जात नाहीय, अजय बोरस्ते यांना देखील भेटलो आहे. पक्ष मजबूत असून गंगेवर सगळे विधी होतात, या गटाचं गोदावरीत लवकरच श्राद्ध घातलं जाईल, अशा इशारा देखील यावेळी राऊत यांच्याकडून देण्यात आला. सरकार बदललं की आपली माणसं आणण्याचे प्रयोग सुरू असतात. मुंबई नगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. मात्र या घटना बाह्य सरकारची मानसिक तयारी नाही. त्यांच्या मनामध्ये पराभवाची भीती असल्याचे अंधेरीच्या पोटनिवडणुकीने दाखवून दिल्याचे ते म्हणाले.