एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकमध्ये 'पुष्पा'चा कारनामा, मद्याच्या वाहतुकीसाठी अनोखी शक्कल, पोलिसही चक्रावले! 

Nashik Crime : नाशिकमध्ये अनेकवेळा पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पुष्पाला राज्य उत्पादन शुल्कने ताब्यात घेतले आहे.

Nashik Crime : पुष्पा (Pushpa) चित्रपटाचा फिव्हर अद्यापही अनेकांच्या डोक्यात तसाच असल्याची अनेक उदाहरणे वारंवार घडताना दिसत आहेत. पुष्पा चित्रपटानंतर अनेक भामट्याना पोलिसांना गुंगारा देऊन अवैध वाहतूक (Illegal Trafficking) करताना ताब्यात घेतले आहे. अशाच एका पुष्पाला नाशिकमध्ये (Nashik) राज्य उत्पादन शुल्कने ताब्यात घेतले आहे. मद्याच्या वाहतुकीसाठी या पुष्पाने अनोखी शक्कल वापरल्याने पोलीस देखील काही वेळ चक्रावले. 

नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) सध्या अवैध धंद्याच्या समूळ उच्चाटन साठी विशेष मोहीम राबवित आहेत. त्याच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा भामट्यांच्या मागावर असताना अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पालघर (Palghar) येथील मद्य तस्कराने टेम्पोमध्ये 12 प्लास्टिकच्या ड्रममध्ये साबण बनविण्याच्या जेलीच्या पाकिटातून महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या तब्बल 1920 मद्याच्या बाटल्या वाहतूक करतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाला मिळून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील कसबे वणी गावात एका हाॅटेलच्या समोर ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क (State Exice)) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या कळवण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली. एका टेम्पो मधून मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे गुप्त माहिती मिळालाय. त्यानुसार पथकाने वणी दिंडोरीरोडवर सापळा रचला. काही वेळातच या मार्गावरून संशयित टेम्पो येताना दिसून आल्याने त्याला थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता टेम्पोमध्ये 12 प्लास्टिकचे सीलबंद ड्रम आढळून आले. वाहन चालक संशयित दिनानाथ सीताराम पाल याकडे चौकशी केली असता ड्रममध्ये साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या जेलची पाकिटे असल्याचे सांगितले. त्यामुळे सुरवातीला ड्रममध्ये खरोखर जेली पाकिटे असावी असे पथकाच्या अधिकाऱ्यांना वाटले होते. 

मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी सहजच एक ड्रम उघडण्यास सांगितला असता चालकाने नकार दिल्याने पथकाला संशय आला. पोलिसांनी तात्काळ ड्रमचे सील तोडून पाहिले असता जेलीच्या पाऊचमध्ये मद्याच्या बाटल्या असल्याचे आढळून आले. 12 ड्रम मधून दादरा व नगर हवेली निर्मीत विदेशी मद्याचे 1920 बाटल्या पथकाने जप्त केल्या. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या चालकाकडून वाहन मालक, मद्यसाठा पुरवठादार आणि मद्य खरेदी करणारे ज्ञान अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुष्पा सारखा अंदाज, अन् चोरीची शक्कलही 
दरम्यान संशयित दीनानाथ पाल हा अनेक दिवसांपासून अशा पद्धतीने मद्याची चोरटी वाहतूक करत होता. मात्र अशा पद्धतीने पुष्पा स्टाईल वापरून वाहतूक करत असल्याने निदर्शनास येत नव्हते. शिवाय जेली पाकिटांची वाहतूक करत असल्याचे दिसत होते. या संदर्भातील कागदपत्रे तो बाळगून असल्याने पोलिसांना संशयाला जागा नसायची. यामुळेच तो तो पोलिसांच्या नजरेतून सुटत होता. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी योग्य तपास केल्याने संशयित दीनानाथ पाल च्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget