एक्स्प्लोर

Prakash Ambedkar Nashik : शिव-भीमशक्ती युतीवर प्रकाश आंबेडकरांचे नाशिकमध्ये महत्वाचं वक्तव्य, म्हणाले... 

Prakash Ambedkar Nashik : शिवशक्ती भीमशक्ती युतीवर प्रकाश आंबेडकर यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे.

Prakash Ambedkar Nashik : गेली काही दिवसांपासून सुरु असलेल्या शिवशक्ती भीमशक्ती (Shivshakti Bhimshakti) युतीवर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे.  शिवशक्ती भीमशक्तीला काँग्रेस राष्ट्रवादीचा (NCP) विरोध कायम असल्याचे दिसत असून आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे शिव भीम शक्तीचा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे अद्यापही शिव भीम शक्तीवर शिक्कामोर्तब नसल्याचे आंबेडकरांच्या प्रतिक्रियेवरून दिऊन येत आहे. 

धम्म मेळाव्यानिमित्त (Dhamm Melava) ऍड. प्रकाश आंबेडकर हे नाशिकमध्ये (Nashik) आले असून एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अनेक मुद्दयांना हात घालताना शिव भीम शक्ती युतीच्या घोड अडलंय कुठं? या प्रश्नाचं उत्तर देखील त्यांनी यावेळी दिले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महावीकास आघाडी बैठकीआधी उद्धव ठाकरे यांचा कॉल आला होता की वंचितचा मुद्दा निकाली काढतो म्हणून, मात्र त्यांच्या बैठकीत मुद्दा चर्चेला गेला की नाही माहीत नाही पण अजित पवारांनी प्रेसमध्ये सांगितलं की तो विषय चर्चाधीन आहे, याचा अर्थ त्यांचा विरोध कायम आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस मागच्या लोकसभा आणि विधानसभेत आम्हाला सोबत घ्यायला तयार नव्हते, आज त्यांचा स्टँड तोच असल्याचे आंबेडकर म्हणाले. 

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीआधी उद्धव यांचा कॉल आला होता की वंचितचा मुद्दा निकाली काढतो म्हणून, मात्र बैठकीत मुद्दा चर्चेला गेला की नाही माहीत नाही पण अजित पवारांनी प्रेसमध्ये सांगितलं की तो विषय चर्चाधीन आहे. याचा अर्थ त्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे हा बॉल सेनेच्या कोर्टात आहे, की त्यांना आम्हाला घेऊन महाविकास आघाडीत जायचे आहे, शिवसेनेला ठरवायचे आहे की त्यांना आम्हाला सोबत घ्यायचे की महाविकास सोबत जायचे, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी उपस्थित केला. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमंत मराठ्यांचे ते प्रतिनिधी करतात, त्यांचा वंचित बहुजन आघाडीला सोशल विरोध आहे. उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट केले नाही तर आम्ही एकटे राहू पण भाजप सोबत जाणार नाही, वंचित बहुजन आघाडी ही पहिल्यापासून मनुवादी व्यवस्थेविरोधात काम करत आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती शक्य नाही, मात्र शिवसेनबरोबर जाण्यास आम्ही तयार आहोत, मात्र सध्या महाविकास आघाडीचा निर्णय असून उद्धव ठाकरेंच्या गोटात हा निर्णय असल्याचे आंबेडकर म्हणाले.  

काही दिवसांपूर्वी भेट 
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सशर्त तयारी दाखवली. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या रिलॉन्चिंगच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर एकत्र आले होते. आणि त्याआधीपासूनच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातल्या संभाव्य युतीची चर्चा सुरु झाली होती. अखेर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा केली. आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीसाठी होकार कळवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत विषय चर्चाधीन असल्याचे आज प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget