एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकचं तापमान दर दहा दिवसांनी घसरतंय, आजचा पारा 10.3 अंशावर, तर निफाड 7.5

Nashik News : नाशिकचे तापमानात दर दहा दिवसांनी घसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

Nashik News : नाशिकच्या (Nashik) तापमानात कमालीची (Temprature) घट झाली असून आज पुन्हा हुडहुडी वाढली आहे. जिल्ह्यातील निफाडचा (Niphad) पारा घसरला असून 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाडमध्ये 7.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे थंडीची सुरवात झाल्यापासून दर दहा दिवसांनी तापमान घसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

नाशिक सह जिल्ह्यात थंडी (Cold) गायब झाल्याचा जाणवत असताना अचानक मागील दोन दिवसांपासुन नाशिककरांसह जिल्ह्यात हुडहुडी भरली असून आज अचानकपणे नाशिक शहराचा पारा 10.3 अंशापर्यंत घसरला. जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये अवघ्या  7.5 अशांवर पारा येऊन थांबला आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत प्रचंड थंडी जाणवत असून दोन दिवसांपासून सकाळी बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे. तर दुसरीकडे अचानक थंडी वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह हरभरा, मसूर, वाटाणा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 
 
थंडी सुरु झाल्यापासून वेळोवेळी वातावरणात बदल होऊन तापमानात कमी अधिक प्रमाणात बदल होऊन पारा घसरत आहे. त्यामुळे  नाशिकसह जिल्ह्यातील तापमानात काही दिवसांपासून वाढ झाल्याचे पाहायला मिळत होते. मागील आठ दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात तापमान कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याने थंडीने कमी झाल्याचे जाणवत होते. मागील काही दिवसांतील तापमानाची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येते कि, कधी 15 तर कधी 14 तर कधी 13 अंशावर तापमान होते. त्यामुळे शेकोट्यांचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र दोन दिवसांपासून अचानक तापमानात घट होऊन नाशिककरांना हुडहुडी भरली. परवापर्यंत नाशिक शहरात थंडीचा पारा 13 अंशावर असताना आज थेट 10 अंशावर येऊन पोहचल्याने कमालीची थंडी जाणवली. तर जिल्हयाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला 7.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यांत अचानक प्रचंड थंडी जाणवत असून सकाळी बाहेर फेरफटका मारणाऱ्यांच्या संख्येतही आज घट झाल्याचे पाहायला मिळाले. 

दर दहा दिवसांनी तापमानात घट 
राज्यात थंडीला सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच थंडीची लाट आलेली होती. दरम्यान थंडीच्या सुरवातीला ओझरमध्ये सर्वात कमी म्हणजे  7.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ओझर हे सर्वात थंड शहर म्हणून आज नोंद झाली. अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा तसेच विदर्भात ही थंडीची लाट अनुभवायला मिळत आहे. राज्यात आकाश स्वच्छ असून वातावरणातील कोरडेपणा वाढला आहे. राज्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात थंडी असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागांतही शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक उबदार कपडे घालत असून सकाळी गरमागरम चहा प्यायला पसंती देत आहेत. त्यामुळे नाशिकसह जिल्ह्यात दर दहा दिवसांनी तापमानात घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget