एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Water Supply : 'गंगापूर धरण तुडुंब, मात्र नाशिककरांना प्यायला पाणी नाही', मनपावर हंडा मोर्चा 

Nashik Water Supply : नाशिकसह (Nashik) शहर परिसरात जोरदार पाऊस (Rain) झाला असताना, नागरिकांना पाणीटंचाईला (Water Crisis) सामोरे जावे लागत आहे.

Nashik Water Supply : नाशिक (Nashik) शहरासह जिल्हा गेल्या काही दिवसात पावसाने (Rain) मुसळधार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र तरीदेखील नाशिक शहरातील काही भागात पाणी प्रश्न (Water Crisis) गंभीर झाल्याने नागरिकांना हंडा मोर्चा काढण्याची वेळ आली आहे.

नाशिकसह शहर परिसरात पावसाने दमदार पुरागमन केले आहे. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी शहर परिसरात तब्बल 86 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पावसाची संततधार सुरूच आहे. असे असताना नाशिक शहरातील सातपूर परिसरात अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न गंभीर झाल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपावर सातपूर परिसरातील नागरिकांनी हंडा मोर्चा काढला असून भाजप नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा सवाल यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

एकीकडे नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सद्यस्थितीत गंगापूर धरण 90 टक्क्यांच्यावर भरले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही धरणे तुडुंब भरले आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरल्याने पुढील काही काळासाठीचा पाणी प्रश्न मिटला आहे. असे असताना शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने ग्राहकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला शहर ढगफुटी होत आहे. शहरातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांचे घसे कोरडेच असल्याचे चित्र दिसत आहे. पाणी आहे मात्र पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना पाणी वाचून दिवस काढावा लागत असल्याची खंत नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली त्यामुळे नाशिक मनपाचा भोंगळ कारभार व व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिक याविषयी मनपाशी संवाद साधत होते. मात्र यास प्रतिसाद मिळत नव्हता. आजही शहरात अनेक ठिकाणी पाणी येत नसून नागरिक आता कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यामुळे आज भाजप नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नाशिक मनपावर हंडा मोर्चा काढला. यावेळी पाणी प्रश्न कधी सोडणार? तसेच मनपा नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष कधी देणार असा सवाल मागण्या यावेळी आंदोलक नागरिकांनी केला.

पाईपलाईन दुरुस्ती झाली का? 

नाशिक शहराला गंगापूर धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र काही दिवसांपूर्वी सातपुर त्र्यंबक रोडवर नाशिक मनपाची १२०० मी.मी. व्यासाची पाइपलाइन फुटली होती. त्यानंतर तातडीने मनपाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले जात होते. त्यानंतर पुन्हा अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी आज नाशिक मनपावर हंडा मोर्चा काढण्यात आला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget