Nashik Police Accident : गाडीवर झाड कोसळलं, नाशिकच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू, पोलीस क्षेत्र हळहळलं
Nashik Police Accident : नाशिक येथून एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या गाडीवर झाड कोसळले.
Nashik Police Accident : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल कासोदाकडे एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offenses Branch) पथकाच्या गाडीवर झाड कोसळलं. यात नाशिक (Nashik) आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यासह चालक अजय चौधरी यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. या घटनेनं नाशिक पोलीस क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे.
नाशिक शहरातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर (Sudarshan Datir) हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल कासोदाकडे जात होते. आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे पथक अंजनी धरणाजवळून जात असताना पथकाच्या गाडीवर झाड (Tree Collapsed) कोसळले. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक दातीर यांच्यासह चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवाने दुर्दैवी घटना घडली. तर चंद्रकांत शिंदे, निलेश सूर्यवंशी, भरत जेथवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, या घटनेने संपूर्ण नाशिक पोलीस (Nashik Police) क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. त्यानंतर सिडकोतील मोरवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक निंबाळकर यांच्यासह सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील, हेमंत नागरे यांनी दातीर यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली. यावेळी दातीर यांच्या आठ महिन्याच्या तानुल्याकडे पाहून सर्वांनाच गहिवरून आले. त्यांच्या पश्चात पत्नी आई-वडील भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. यावेळी आमदार सीमा हिरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर, ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप आदीसंह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. परिचर ते साहाय्यक पोलीस निरीक्षक असा प्रवास आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर हे पोलीस खात्यात दाखल होण्यापूर्वी नाशिक जिल्हा परिषद परिषद म्हणून कार्यरत होते. त्यांची मूळ पद्धत स्थापना पेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात होती. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी त्यांच्या पेठ तालुक्यातील शासकीय भेटीत सुदर्शन जातील यांची प्रतिनियुक्ती पद स्थापना जिल्हा परिषद मुख्यालय करून घेतली होती. त्यानंतर दातीऱ्यांची राज्यसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस खात्यात नियुक्ती झाली होती. ते सध्या ते नाशिक शहरातील आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :