Nashik Raj Thackeray : नाशिकमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाशी मनसेचा संबंध नाही, राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण
Nashik Raj Thackeray : नाशिक (Nashik) शहरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम मनसेच्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांकडून आयोजित करण्यात आला होता.
Nashik Raj Thackeray : तीन दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील तिचा कार्यक्रम मनसेच्या विद्यार्थी पदाधिकाऱ्यांकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी बराच गोंधळ होऊन दोन पत्रकारांना उपस्थित तरुणांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आजपासून दोन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी याच आठवड्यात नाशिक शहरात मनसे विद्यार्थी पदाधिकाऱ्यांकडून आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्या कार्यक्रमाशी मनसेचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले आहे. तीन दिवसांपूर्वी मनसेचे (MNS) एका विद्यार्थी पदाधिकाऱ्याच्या नवनिर्माण नामक संस्थेच्या माध्यमातून शहरातील ठक्कर डोम या ठिकाणी गौतमी पाटील (Gautami Patil) च्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी तीनशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत तिकीट ठेवण्यात आली होती. तसेच संपूर्ण शहरात मोठी बॅनरबाजी माध्यमातून जाहिरात करण्यात आली होती. विशेष म्हणजे शहरातील गौतमी पाटीलचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे गर्दी होणार निश्चित होतं.
दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून रुग्णवाहिका घेण्यासाठी निधी संकलन करण्यात येत होतं आणि याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या दिवशी शहरातील तरुणांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. मात्र स्टेजच्या समोरच गर्दी होती तर पाठीमागे मात्र रिकाम्या खुर्च्या दिसून आल्या. याच कार्यक्रमात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चाहत्यांनी गोंधळ घातला. कार्यक्रमाचे वृत्तांकन करणाऱ्या फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांच्या कामात व्यत्य येऊ लागल्याने त्यांनी प्रेक्षकांना विनंती केली. मात्र टोळक्याने विनंती ऐकण्याऐवजी थेट पत्रकारांना मारहाण केल्याची घटना घडली. या सर्व घडामोडींवर मुख्यत्वे कार्यक्रमावर अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे युवककेंद्री पक्ष
आज नाशिकमध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिक शहरातील गौतमी पाटील च्या कार्यक्रमासंदर्भात प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्या कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही, अशा शब्दांत स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान मनसे पक्ष हा युवक केंद्रीय पक्ष असल्याचा पक्ष आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचे मध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे नेहमीच मनसेच्या युवकांकडून काही ना काही स्तुत्य उत्तम केले जातात. त्याद्वारे मनसेतील कार्यकर्ते हे सक्रिय असल्याचे दिसून येते. मात्र दुसरीकडे नाशिक शहरात युवक कार्यकर्त्यांकडून गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने चर्चा झाली. मात्र दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमास मनसेचा संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केल