एक्स्प्लोर

Nashik News : गाव पाणीदार करा आणि 10 लाख रूपयांचा निधी मिळवा, नाशिकच्या पालकमंत्र्यांचे आवाहन 

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात निश्चितच पाणीदार करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले.

Nashik News : नाशिक जिल्हा परिषदेचा (Nashik ZP) मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात निश्चितच पाणीदार होतील असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा. त्याचप्रमाणे या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना (Grampanchayat) शासनाच्या निधीसोबतच 10 लाख रूपयांचा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिक शहरातील (Nashik) गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषद नाशिकतर्फे आयोजित मिशन भगीरथ प्रयास (Mission Bhagiarth Prayas) उपक्रम कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले, मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातून पिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्नमार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच मनरेगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार असून दुष्काळ काळात होणारे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबणार आहे. लोकांनी स्वत:च्या गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. लोकसहभागातून काम करतांना गावातील जेष्ठ मंडळीचे अनुभव व मार्गदर्शन पूरक ठरणार असून त्यांच्या मार्गदर्शनातून पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची जागा निश्चित करण्यात यावी, असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री दादा भुसे पुढे म्हणाले, आज जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी समर्पित भावनेतून कोणताही शासनाचा निधी न घेता केलेल्या कार्यातून राजस्थानमधील गावांचे चित्र बदलले आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन व प्रेरणा जर नाशिक जिल्ह्यास लाभली तर निश्चितच मिशन भगीरथ प्रयास उपक्रम यशस्वी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावपातळीवर महिला सरपंच यांचा सहभाग वाढला पाहिजे, अशी आशाही पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिशन भगीरथ प्रयास अंतर्गत साधारण 200 गावांतून 705 कामांचे नियोजन करण्यात आले असून या कामांसाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे. गावांतील नागरिकांनी या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभागी होवून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले.

पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात

नाशिक जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेला मिशन भगीरथी उपक्रम स्थुत्य असून शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, असे प्रतिपादन जलतज्‍ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी यावेळी केले. भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यााठी भूगर्भाचा अभ्यास, संशोधन करणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे, योग्यस्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावातील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकर्सची संख्या कमी होऊन मिशन भागीरथ प्रयास यशस्वी होईल, असा विश्वासही यावेळी जलतज्‍ज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
Pune Airport Renamed: पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा मराठी हेडलाईन्स  04 PM TOP Headlines 04 PM 21 September 2024एबीपी माझा मराठी हेडलाईन्स  03 PM TOP Headlines 03 PM 21 September 2024Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaKirit Somaiyya Mumbai :

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
आईने मोबाईल घेतल्याने मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; दुसऱ्या घटनेत 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
मोठी बातमी : महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं कुठलंही सूत्र नाही, संजय राऊत यांची माहिती
Pune Airport Renamed: पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात देणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा
Maratha vs OBC : वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आमने-सामने, मनोज जरांगे म्हणाले, दादागिरी करायची नाही
नादच खुळा...  इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
नादच खुळा... इलेक्ट्रिक बसमध्ये आता बससुंदरी; गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल
CJI Sarosh Homi Kapadia : शिपाई ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ! असा प्रवास करणारी व्यक्ती आहे तरी कोण?
शिपाई ते देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ! असा प्रवास करणारी व्यक्ती आहे तरी कोण?
श्रीगोंदा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, शरद पवार कुणाला तिकीट देणार?
श्रीगोंदा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी, शरद पवार कुणाला तिकीट देणार?
Embed widget