(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : येवल्यात मी कोणावर टीका करायला नाही तर माफी मागायला आलोय : शरद पवार
Sharad Pawar : माझ्या विचारावर तुम्ही साथ दिली. पण माझा अंदाज चुकला, आता पुन्हा ती चूक करणार नाही : शरद पवार
Sharad Pawar : महाराष्ट्रात नाशिक (Nashik) जिल्ह्याने गेली अनेक वर्ष पुरोगामी विचाराला साथ दिली आहे. कोणत्याही जिल्ह्यांनी साथ सोडली नाही, आज मी इथे आलोय तर ते कोणावर टीका करण्यासाठी नाही, आज मी माफी मागण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. माझ्या विचारावर तुम्ही साथ दिली. पण माझ्या निर्णयामुळे तुम्हाला यातना झाल्या. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की तुम्हा सगळ्यांची माफी मागायची, म्हणून आज इथे आल्याचे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार (Sharad Pawar) यांची येवल्यात (Yeola) जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, ज्यावेळी कधी तुमच्यासमोर येण्याची वेळ येईल. आज येईल, उद्या येईल, महिन्यात येईल, वर्षांनी येईल. त्यावेळी मी पुन्हा तुमच्यासाठी येईल. त्यावेळी योग्य निकाल सांगेल. त्यावेळी अंदाज चुकणार नाही. राजकारण कधी करायचं तर सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी. स्वातंत्र्य चळवळीत देखील हा तालुका, जिल्हा नेहमीच अग्रभागी राहिलेला आहे. नाशिक (Nashik district) जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जात आहे. मात्र येवला मतदारसंघात आजही अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सोबत असून तुमची माफी मागण्याचे माझे कर्तव्य असल्याचे शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले की, एक काळ असा होता की, ज्यात चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे म्हणून आम्ही झगडत होतो. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी भाषणात काँग्रेसवर टीका केली, राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. माझं पंतप्रधान यांना सांगणे आहे की आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर, असेल नसेल तर सर्व यंत्रणा वापरा, जर आम्ही दोषी असलो तर कारवाई करा, आमची जी काही चौकशी करायची ती करा, जो काही निष्कर्ष निघेल, तो आम्ही स्वीकारायला तयार आहे, अन्यथा माफी मागा, असे आव्हान शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
वयाच्या भानगडीत पडू नका...
शरद पवार यांच्या वयाबाबत काही दिवसांपासून टीका केली जात आहे. यावर देखील पवार यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, 'माझं वय 82 झाले हे खरे' पण माझ्या वयाचे बाबत बोलू नका, महागात पडेल, असा इशाराच दिला आहे. काही लोक बोलले की तुमचं वय झाले, आता थांबलं पाहिजे, वय झालं आहे, हे खरं आहे, पण तुम्ही गडी पाहिलाय कुठे? असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उगा वयाबियाच्या भानगडीत पडु नका, महागात पडेल, कार्यक्रमावर टीका करा पण व्यक्तिगत टीका करू नका, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला कुणी तडा देत असेल कोणी विश्वात करत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही जर कोणी असं करत असेल तर त्याची किंमत आज ना उद्या त्याला द्यावी लागेल असा इशारा देखील पवारांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Chhagan Bhujbal : शरद पवार यांचं माझ्यावर अतोनात प्रेम, म्हणून माझा नंबर पहिला, असं का म्हणाले मंत्री छगन भुजबळ