Nashik Leopard : नाशिकमध्ये आजचा दिवस बिबट्याने गाजविला, मुक्त संचार, हल्ले, हुलकावणी!
Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहरात अनेक भागात बिबटयाचा (Leopard) मुक्त संचार नागरिकांना दिसून येतो.
Nashik Leopard : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील काही भागात बिबट्याचे (Leopard) दर्शन सतत होत आहे. अशातच शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलच्या मागे बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान सकाळपासून या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून (Forest) शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र हॉटलेच्या पाठीमागील बाजूस गवत झाडी असल्याने बिबट्या पसार झाला. वनविभागाकडे मात्र सदर परिसराकडे डोळे लावून आहे.
नाशिक शहर असो कि नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील निफाड (Niphad), सिन्नर (Sinnar) आदी परिसर असो. येथील नागरिकांना बिबट्याचे दिसणे नवे नाही. दिवसांतून चारदा बिबट्याचे दर्शन होत आहे. तर नाशिक शहरात अनेक भागात बिबटयाचा मुक्त संचार नागरिकांना दिसून येतो. आज सकाळी बिबट्याच्या बातमीने झालेली सुरवात सायंकाळी शेवटही करून गेली. आज सकाळपासून नाशिक शहरात बिबट्याच्या संचार, हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सकाळी सिन्नर (Sinnar) तालुक्यातील सांगवी परिसरात दोन बिबट्यांच्या नारळाच्या झाडावर चढतानाच व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर संबंधित वनविभागाने घटनास्थळी जाऊन या व्हिडिओची पुष्टीही केली. त्यांनतर घटनास्थळी आता ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र सकाळपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
तर शहरातील पाथर्डी परिसरात सकाळी बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली. भरवस्तीत, लोकांच्या समोरून बिबट्याचा जात असल्यांचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाने तातडीने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता. सकाळी पाऊस सुरु असल्याने परिसरात कामगार वर्गाचे काम सुरु करण्याची वेळ होती. अशावेळी परिसरात अचानक बिबट्या आल्याने सर्वांचीच धांदल उडाली. त्याचवेळी परिसरात असलेल्या इमारतीमधील नागरीकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांनी तात्काळ आजूबाजूला असलेल्या लोकांना आवाज देऊन सावध होण्यास सांगितले. मात्र बिबट्या आपल्या रस्त्याने वाट मिळेल तिकडे निघून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
बिबट्याचे हल्ले सुरूच
बिबट्या प्रवण क्षेत्र असलेल्या सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात शेतात असलेल्या मजुरांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हरी साहेबराव नारोडे असे जखमी झालेल्या शेतमजुरांचे नाव आहे. सध्या नारोडे मजुरावर प्राथमिक उपचार असून त्याची प्रकृती बरी आहे. तर दुसऱ्या घटनेत दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील बाकेराव हरी जाधव हे आपल्या शेतातील विहिरीकडे घरातील पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी जात असताना अचानक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यात शेतकऱ्याच्या मानेला, गळ्याला तसेच पायाला मोठ्या प्रमाणत जखमा झाल्या असून संबधीत शेतकऱ्याने जोरदार प्रतिकार केला व तसेच आरडाओरड केल्याने परिसरात शेतकरी त्वरित आल्याने त्या शेतकऱ्याची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली.