(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Politics : ते आले, त्यांनी ऐकलं, काही बोललेच नाही, नाशिकमध्ये पुन्हा शिंदे गटाचा 'करेक्ट कार्यक्रम'
Nashik Politics : संजय राऊत ज्या ज्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत, त्या त्या वेळी ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे काम शिंदे गटाने केले आहे.
Nashik Politics : एकीकडे संजय राऊत (Sanjay Raut) वारंवार नाशिक दौऱ्यावर येत असताना दुसरीकडे त्या त्या वेळी ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे काम शिंदे गटाने केले आहे. सत्तांतरानंतर संजय राऊत नाशिकमध्ये येण्याची चौथी वेळ असेल, यावेळी देखील काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राऊत नाशिकमध्ये येण्यापूर्वीच पुन्हा शिंदे गटाने (Shinde Sena) करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले जात आहे.
नाशिक (Nashik) हा शिवसेना ठाकरे (Shivsena) गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र शिवसेना ठाकरे गटातून इनकमिंग पेक्षा आऊटगोईंग अधिक होत असल्याचे चित्र आहे. अशातच आदित्य ठाकरे (Aditya Thackrey), संजय राऊत हे वेळोवेळी नाशिक दौऱ्यावर येऊन ठाकरे गटातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना याउलट सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वतः उद्धव ठाकरे नाशिकला येऊन सभा घेणार होते, त्यासाठी संजय राऊत नाशिकला आले होते, मात्र तेव्हादेखील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली. आज पुन्हा संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत असताना ते येण्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत नेमके नाशिक दौऱ्यावर येत असतानाच ठाकरे गटाला धक्का बसतो आहे. विशेष म्हणजे हे काही आज होत असे नाही. यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने शिंदे गटाने करेक्ट कार्यक्रम केला आहे. अशातच आज विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेत काम करणारे संदीप गायकर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका हर्षदा गायकरसह युवती सेनेच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे नाशिकमध्ये संजय राऊत ठाकरे गटातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी येत आहे. मात्र त्या आधीच ठाकरे गटात डॅमेजचा सिलसिला सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी नगरसेविका हर्षदा गायकरसह युवती सेनेच्या अनेक महिला पदाधिकारी शिंदे गटाची वाट धरली असून आज दुपारी वर्षा बंगल्यावर त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
Nashik Political News : शिंदे गटाविरोधात रणनीती आखणार..
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. ते ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकत्यांशी संवाद साधणार आहे. राऊत कार्यकर्त्यांना काय सूचना देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाला सुरु असलेली गळती कायम आहे. संजय राऊत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी येण्याअगोदरच डॅमेज आणखी वाढल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाविरोधात रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांचा देखील आढावा घेणार असल्याची, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.