एक्स्प्लोर

Nashik Ujjwal Nikam : मराठी शाळेत शिकलो, कविता लिहल्या, आज हायकोर्टात वकील, उज्वल निकम यांनी उलगडला जीवनपट 

Nashik Ujjwal Nikam : मनात प्रामाणिकपणा आणि सत्य बोलणे असेल तर माणूस घाबरत नाही, असे मत विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केले. 

Nashik Ujjwal Nikam : मराठी शाळेत शिकलो आहे, त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करण्याची धमक लहानपणापासून आहे. शालेय जीवनात इस्त्रीचे कपडे कधी घातले नाही. त्यांनतर जेव्हा हायकोर्टात गेलो, तेव्हा इंग्लिशमध्ये बोलणे, वगैरे बघितले. पण मनात प्रामाणिकपणा आणि सत्य बोलणे असेल तर माणूस घाबरत नाही. याच मार्गावरून पुढे चालत राहिलो, आज हायकोर्टात तुमच्या आमच्या-सारख्या लोकांना न्याय देण्याचे करत असल्याचे मत विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी व्यक्त केले. 

नाशिकच्या (Nashik) कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये (Kusumagraj Pratisthan) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. आज दुपारी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची प्रकट मुलाखत आयोजित साहित्य संमेलनात पार पडली, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर (Vishvas Thakur) यांनी वकील उज्वल निकम यांची मुलाखत घेतली. यावेळी ठाकूर यांच्या प्रश्नांना निकम यांनी दिलखुलास उत्तरं दिली. याच मुलाखतीत बोलतांना वकील उज्वल निकम यांनी थोडक्यात जीवनपट उलगडला. ते म्हणाले कि, लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे का? सामान्य माणसाला आजही न्यायव्यवस्था हा शेवटचा आशेचा किरण म्हणून दिसतो आहे. मात्र प्रसारमाध्यम काय दाखवतात, यावर सामान्य माणूस जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे प्रसारमाध्यमानी लोकांचे हिताचे प्रश्न मांडणे आवश्यक असल्याचे निकम म्हणाले. 

यावेळी वकील उज्वल निकम यांनी जीवनपट उगलगडताना अनेक प्रकरणांचा उहापोह घेतला. ते म्हणाले की, शायर आपल्या शायरीतून अनेक वेळा वकिलांचा अपमान करतात. कॉलेज जीवनात काहींना प्रेमात, काहींना पिल्यावर तर मला संतापाने कविता सुचायच्या. जिच्यापुढं कधीच डाळ शिजत नाही ती  असते बायको असते. आज माझे वय 71 आहे, पण वयावर काहीही अवलंबून नसते. आम्ही चेहऱ्यावरुन माणसे ओळखतो. मुंबई हल्ल्यानंतर जळगावमधून मुंबईला जाण्यामागे सीआयडी होती. नाशिकच्या एका केसनंतर दहशतवाद्याशी कोण लढू शकतो, याचा शोध सुरू झाला होता. गुलशनकुमार प्रकरणात नदीमला आपण आणू शकलो नाही. इंग्लंडमधल्या न्यायव्यवस्थेत पोलिसांच्या शब्दावर जास्त विश्वास ठेवत असल्याचे ते म्हणाले.. 

जेव्हा अबू सालेम संतापला.... 

दरम्यान वकील उज्वल निकम यांनी अबू सालेम (Abu Salem) संदर्भात बोलताना एक किस्सा सांगितलं. तो असा की, 'अबू सालेम नावाचा एक गुंड आपल्याला माहीत आहे. प्रदीप जैन नावाच्या एका बिल्डरला त्याने मारले होते. अबू सालेम दिसायला हिरो होता. मी त्याला विचारले होते की, मोनिका बेदीने तुझ्याशी लग्न केले होते का? तो संतापला होता. हा मृत्यूचा व्यापारी आहे, अंधारकोठीची शिक्षा करा याला असे मी म्हणताच त्याचा चेहरा लाल होता. माझ्याकडे रागाने बघत होता. जेलमधून परवा त्याने एका गुन्हेगारासोबत मला एक पत्र पाठवले होते. आपल्याविषयी गुन्हेगारांमध्ये आदर निर्माण होणे हे पण विशेष . प्रत्येक खटला हा परिस्थितीवर आधारित होता. अंजना गावित, रेणूका आणि सीमा या प्रकरणी जेव्हा फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा कोल्हापूर कोर्टाबाहेर लहान मुलांनी साखर दिली, हा माझ्यासाठी खूप छान क्षण असल्याचे निकम म्हणाले. 

कसाब मला बादशहा म्हणायचा.... 

दरम्यान, मुंबई हल्ल्यात (Mumbai Blast) पकडण्यात आलेल्या कसाबला फाशी दिल्यानंतर खूप मोठा आंनद झाला. कसाबला निशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. तीन दलांनी कोर्टाला बंदोबस्त दिला होता. त्यावेळी फाशी हा महत्वाचा विषय नव्हता. तर लष्करी तोयबा ज्याला आता जमात उ दामा म्हणतात, तेही ताकद देत होते.  अतिरेक्यांचा लाईव्ह खटला पहिल्यांदाच झाला. कसाबच्या मागे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचा चेहरा आम्ही टराटरा फाडला. तेव्हा भारताकडून मदत बंद करण्यात आली होती, आता सुरू झाली आहे. कसाब मला बादशहा म्हणायचा, राखी पौर्णिमेला त्याने मला विचारले की ही राखी काय आहे? कसाबला बहिणीची आठवण आली तो रडू लागला, असे हिंदी आणि इंग्लिश चॅनलवाल्यांनी सुरू केले. फुकट फौजदारी करणारे म्हणजे चॅनलचे पॅनलिस्ट असतात. मी बाहेर येताच मला प्रश्न विचारले मीडियाने, कसाब रडत होता, मी म्हटलो कसाबने मटण बिर्याणी मागितली. मला फसवायचे नव्हते किंवा सहानुभूती नव्हती हवी, आपला उद्देश चांगला असेल तर वाट कोणतीही स्वीकारलेली चालते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget