एक्स्प्लोर

Nashik Crime : शिपायाने ग्रामसेविकेसह सरपंचाला शिकवला धडा.. इगतपुरीत लाच घेताना तिघांना अटक 

Nashik Crime : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील बलायदुरी येथील ग्रामसेविकेसह महिला सरपंच एसीबीच्या जाळ्यात सापडली.

Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात लाचखोरीने अक्षरशः उच्छाद मांडला असून नाशिकसह जिल्ह्यात दर आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असताना लाचखोरी (Bribe) थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलुचपत विभागाचे अधिकारी, कर्मचारी कसोशीने लाचखोरीला आळा बसावा यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु लाचखोरी थांबायचं नाव घेत नाही. 

नाशिक इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील बलायदुरी येथील ग्रामसेविकेसह महिला सरपंच एसीबीच्या जाळ्यात सापडली असून ग्रामपंचायत शिपायाकडून 50 हजारांची लाच घेताना या दोघींसह एकास अटक करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील ग्रामपंचायतीच्या निवृत शिपायाचा रहिवास भत्ता मंजूर करण्यासाठी 50 हजारांची लाच घेणाऱ्या सरपंचासह ग्रामसेविकेला व एका नागरिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. आशा देवराम गोडसे या ग्रामसेविकेसह हिरामण पांडुरंग दुभाषे या सरपंचाला व मल्हारी पंढरीनाथ गटकळ या नागरिकाला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. 

तक्रारदार हे बलायदुरी ग्रामपंचायतीचे शिपाई असून, जून 2020 मध्ये निवृत्त झाले. ग्रामपंचायतीकडून त्यांना 1 लाख 64 हजार 682 रुपये भत्त्याच्या बिलाची रक्कम मिळणे बाकी होते. या रकमेचा धनादेश बनवून देण्यासाठी गोडसे व दुभाषे यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या तिघांना पकडले. एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, राजेंद्र जाधव संतोष गांगुर्डे व अंमलदार शरद हैंबाडे, नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

नाशिकसह जिल्ह्यातील मागील काही लाचखोरीच्या घटनांचा आढावा घेतला असता नाशिक जिल्ह्यात दहापेक्षा अधिक लाचखोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यांनतर आता थेट राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीचे जाळे शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पसरल्याचे अधोरेखित झाले आहे.

लाच मागितल्यास इथे संपर्क साधा... 

दरम्यान या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलिस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एसीबीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वारSpecial Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Embed widget