(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dada Bhuse : नाशिककरांचे आभार! जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार : पालकमंत्री दादा भुसे
Dada Bhuse : नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी जनतेचे आभार मानले.
Dada Bhuse : आज नवरात्रोत्सवाच्या (Navratri) निमित्ताने कालिका मातेचे (Kalika Mata) दर्शन घेऊन नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून आज विविध लोकप्रतिनिधी, संस्था प्रशासन यांच्या सूचना जाणून घेऊन पुढील कामकाजाचा आराखडा तयार करणार असून नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी नाशिक च्या जनतेचे आभार मानले.
काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारने राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदी अनेक मंत्री, आमदारांची नियुक्ती केली. यामध्ये नाशिककरांचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मंत्री दादा भुसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रथमच आज पालकमंत्री दादा भुसे आज नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांनी नाशिकचे ग्रामदैवत कालिका मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी आज नाशिक चे ग्रामदैवत कालिका मातेचे दर्शन घेत नाशिकच्या जनतेचे आभार मानले.
यावेळी पालकमंत्री दादा भुसे म्हणाले कि, पहिल्यांदा नाशिककरांचे आभार. नाशिककरांच्या सहकार्यामुळे आजचा दिवस असून आनंदाचा दिवस आहे. सर्वानी नवरात्री आनंदात साजरी करा. त्याचबरोबर आगामी काळात नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. जिल्ह्यातील संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या सूचना जाणून घेणार असून त्या दृष्टीने जिल्ह्यात अनेक प्रकल्प विकसित करणार असल्याचे ते म्हणाले. विकास प्रकल्पाबाबतचा अजेंडा जाहीर केला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या लोकांच्या सूचना घेऊन त्यांच्यासोबत काम करणार आहोत. यासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचना घेऊन नवीन प्रकल्प काय करणार याबाबत आराखडा तयार करणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
कालिकेचे घेतले दर्शन
गेल्या पाच दिवसांपासून नाशिक शहरात नवरात्रोत्सवामुळे चैतन्याचे वातावरण असून निर्बंधमुक्त नवरात्री साजरी होत असल्याने नाशिककर आनंद लुटत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असेलल्या कालिका मातेच्या दर्शनासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी आज मंदिरात हजेरी लावली. यावेळी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेल्याचे दिसून आला. पालकमंत्री दादा भुसे यांनी सकाळी नाशिकमध्ये हजेरी लावत पहिल्यांदा कालिका मातेचे दर्शन घेतले. त्याचबरोबर कालिका मातेच्या पूजा विधी केला. यावेळी त्यांच्याबरोबर नव्याने शिंदे गटात सामील झालेले प्रवीण तिदमे यांच्यासह खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते.