(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : वडिलांना शोधायला गेला तरुण, मात्र तिथं भलतंच घडलं, टोळकं आलं, अन्... नाशिक शहरातील घटना
Nashik Crime : नाशिकची गुन्हेगारी (Crime) पोलिसांची डोकेदुखी, तर सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरत आहे.
Nashik Crime : नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं असून गुन्हेगारी (Crime) पोलिसांची डोकेदुखी, तर सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारी ठरत आहे. अशातच शहरातील शिंगाडा तलाव परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने (Nashik crime) वार करत लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV) कैद झाली आहे.
नाशिक (Nashik) शहराला झालंय काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून दिवसाढवळ्या घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांनी सामान्य नागरिक मात्र भीतीच्या सावटाखाली आहेत. नाशिक पोलीस प्रशासन काही दिवसांपूर्वीच कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) राबवून अनेकांना ताब्यात घेतले होते, मात्र गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नसल्याचं चित्र शहरात आहे. शहरातील शिंगाडा तलाव परिसरात टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोन मित्र परिसरातून जात असताना त्यांनी गाडी थांबवली. त्यांच्या पाठीमागून अचानक दोन दुचाकीवर आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने या तरुणावर हल्ला करून पळ काढला आहे.
दरम्यान कामावरून घरी न परतलेल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी चेतन जाधव हा तरुण मित्रासोबत शिंगाडा तलाव परिसरात आला होता. मित्रासोबत तो उभा असतानाच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या 6 ते 7 जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून चेतन जाधव याच्या मानेवर चाकूने वार करून त्याला खाली पाडत लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने त्याला जीवे ठार मारल्याची धमकी देखील दिली. या मारहाणीची संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत चेतन हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला आणि...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन जाधव हा तरुण त्याचे वडील कामाहून परतले नसल्याने वडिलांचा शोध घेण्यासाठी त्याचा मित्र ऋषभसोबत शिंगाडा तलाव परिसरात आला होता. यावेळी शिंगाडा तलाव परिसरात चेतन आणि त्याचा मित्र उभे असताना दुचाकीवरून सहा ते सात जण आले. या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून चेतन जाधव याच्यावर हल्ला चढविला. यातील एका संशयिताने जाधव याच्या मानेवर धार धार शस्त्राने वार करून त्याला खाली पाडत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचं समोर आले.