एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा हटविल्याने तणाव, पुतळा पुन्हा बसवा, अन्यथा आमरण उपोषण 

Nashik News : नाशिकरोड भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Nashik News : नाशिकरोड (Nashikroad) भागातील जयभवानी रोड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळा हटवल्याने सध्या तणाव निर्माण झालेला आहे. नाशिकमध्ये (Nashik) महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या (Nashik Police) विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. पुन्हा पुतळा बसवण्याची आंदोलकांनी मागणी केलेली असून अन्यथा आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. 

नाशिकच्या जयभवानी रोडवरील मनपाच्या नियोजित उद्यानात 6 डिसेंबरला (6 December)  आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला होता, परवानगी न घेता पुतळा बसविल्यानं मध्यरात्री मनपाने पुतळा हटविला. त्यामुळे काही प्रमाणात तणाव निर्माण झाला असून नागरीक रस्त्यावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकरोड परिसरातील जयभवानी रोडवरील तुळजाभवानी मंदिराशेजारी मनपाच्या जागेत उद्यान साकारण्यात येत आहे. त्यामध्ये नव्याने बसविलेल्या गजिबो अनधिकृतपणे चबुतरा बांधून पूर्वपरवानगी न घेता त्या चबुतऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर या ठिकाणाहून पुतळा हटविण्यात आला होता. या पार्शवभूमीवर आज स्थानिकांनी एकत्र येत पुन्हा पुतळा बसवावा ह्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविल्यानं तणाव निर्माण झाला असून स्थानिक नागरिक एकत्र आले. पुतळा हटविला त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेऊन अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर मनपा आणि पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पुन्हा पुतळा बसवावा ह्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले असून जर असे झाले नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे. जय भवानी रोड परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेचा एक नियोजित उद्यान आहे. या उद्यानाच्या जागी एक चौथरा आहे. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आलेला होता. मात्र प्रशासनाने परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो काढून टाकण्यात आला. यानंतर परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती मिळाली असता नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

काय घडली होती घटना 
दरम्यान तुळजाभवानी मंदिराशेजारी दोन ते अडीच गुंठ्यामध्ये मनपाकडून उद्यान विकसित करण्यात येत आहे. उद्यानाच्या पाठीमागे सहा  गुंठे जागेत जलकुंभ उभारण्यात आला आहे. उद्यानामध्ये जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी पॅगोडे बांधण्यात आले आहेत. त्यामध्ये सहा डिसेंबर रोजी अज्ञातांनी चबुतऱ्याचे बांधकाम केले. त्या चबुतऱ्यावर आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा बसवला. उद्यान विकसित करणारे ठेकेदार आणि मजूर दैनंदिन विकासकामे करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे एक चबुतरा व त्यावर महापुरुषाचा अर्धाकृती पुतळा बसविलेला आढळला. त्यानंतर ठेकेदार यांनी हि माहिती अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर तातडीने विभागीय अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अनधिकृत पुतळा बसविल्याप्रकरणी तिघांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
Ashok Kharat Nashik Crime: अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Recruitment:करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कधीपासून भरता येणार? पगार किती मिळणार?  
करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती,  पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा?
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Embed widget