Trimbakeshwer Mandir : हर हर शंभो! वीकेण्डला त्र्यंबकेश्वर गजबजलं, भर पावसातही भाविकांची अलोट गर्दी
Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील जोतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी भर पावसातही भाविकांची गर्दी केल्याचे चित्र आहे.
Trimbakeshwer Mandir : बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील जोतिर्लिंग (Jotirlinga) दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असून आज सकाळपासून पाऊस सुरु असताना देखील भाविकांची संख्या लक्षणीय असल्याचे चित्र आहे. त्यातच विकेंड (Weekend) आल्याने भाविकांसह पर्यटकांची मोठी गर्दी शहरात झाल्याने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) नगरी बम बम भोलेच्या गजरात दुमदुमून गेली आहे.
नाशिक (Nashik) जवळील त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwer Mandir) दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगाला अनन्यसाधारण महत्व असल्याने भाविक नेहमीच त्र्यंबकेश्वरला पसंती देतात. शिवाय नारायण नागबली सारख्या पूजा विधी शहरात होत असल्याने नेहमीच भाविकांचा राबता असतो. अशातच सध्या त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला असून आजुबाजुंचा परिसर पर्यटनाला साजेसा तयार झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाविकांसह पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आज रविवार असल्याने दोन दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. भर पावसातही (Trimbakeshwer rain) नागरिक त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेत असून त्र्यंबक नगरी भाविकांनी गजबजल्याचे चित्र आहे.
दरम्यान वीकएंडला भाविकांनी अध्यात्मिक पर्यटनाला पसंती दिल्याने येथील ज्योतिर्लिंग दर्शनासाठी गर्दी झाली आहे. उत्तर भारतीयांचा श्रावणमास सुरू झाला असल्याने उत्तर भारतीय भाविकांची गर्दी दिसून येत आहे. आज रविवारची सुट्टी असल्याने अनेकांची पावले त्र्यंबकेश्वरकडे (Trimbakeshwar) दर्शनासाठी वळाली आहेत. पावसातही भाविकांचा उत्साह कायम असून भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग व्यवस्था करण्यात आल्याने गर्दी असूनही सुयोग्य नियोजन आहे. दरम्यान भर पावसातही लहानग्यांना खांद्यावर घेऊन अन वृद्धांना आधार देत पूर्वरांगेतून अनेकजण दर्शन घेत आहे. दरम्यान आज रविवार असूनही गर्दी असताना मंदिराचा दक्षिण दरवाजा बंद असल्याचे चित्र आहे.
मंदिराचा दक्षिण दरवाजा बंद?
दरम्यान त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी वर्षभरही गर्दी असते. मात्र या दिवसात ही गर्दी अधिकच वाढते. त्यामुळे शनिवार रविवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्व दरवाजा, दक्षिण दरवाजा दोनशे रुपये देणगी दर्शन रांग असते. शनिवार रविवार गर्दीनुसार दर्शन घेऊन भाविकांना बाहेर पडण्यासाठी दक्षिण दरवाजा सुरू केला जातो. कायमस्वरूपी दक्षिण दरवाजा खुला ठेवण्याची मागणी आहे. भाविकांना यात्रेकरूंना सुटसुटीत नियोजन होण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून दक्षिण दरवाजा खुला ठेवण्याची मागणी होत आहे. उत्तर महादरवाजावर होणाऱ्या गर्दीची विभागणी होण्यास मदत होईल अशी आवाहन करण्यात आले आहे.