Nashik Crime : नाशिक बाफना खून प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) बहुचर्चित बिपिन बाफना (Bipin Bafna) खून प्रकरणी आज न्यायालयाने निकाल दिला आहे.
![Nashik Crime : नाशिक बाफना खून प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल maharashtra news nashik news Death sentence to convicts in Nashik Bafna murder case, district sessions court verdict Nashik Crime : नाशिक बाफना खून प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/16/c94b60b64840572b7a4a91a1e4c0899d167119212837989_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) बहुचर्चित बिपिन बाफना (Bipin Bafna) खून प्रकरणी दोघांना दोषी ठरविण्यात आले होते. यावर गुरुवार झालेल्या सुनावणीनंतर आज न्यायालयाने निकाल दिला आहे. चेतन पगारे, अमन जट या दोघांना दोषी ठरवत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने याबाबत महत्वपूर्ण निकाल देऊन या प्रकरणातील पाच संशयितांपैकी तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर दोघांना दोषी ठरवत गुरुवारी निकाल देणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. मात्र गुरुवारी दीड तास यावर चर्चा होऊन सुनावणी पूर्ण झाली नाही. शुक्रवारी म्हणजेच आज निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज दुपारी या प्रकरणाचा निकाल लागाल असून दोघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जवळपास तब्बल साडे नऊ वर्ष यावर प्रकरणाचा खटला सुरु होता. अखेर साडे नऊ वर्षांनंतर बिपीन बाफना यास न्याय मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
नाशिकमधील बिपीन बाफना याचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात येऊन खून करण्यात आलाहोता. या दोषी आरोपींवर गंभीर स्वरूपाचे २५ गुन्हे दाखल असून त्यांची वर्तणूक ही सुधारण्यापलीकडे गेली असल्याचे सांगत तयन फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी असा युक्तिवाद गुरुवारी सरकार पक्षाकडून न्यायालयात करण्यात आला होता. दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवत शुक्रवारी शिक्षा सुनावणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आज जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणावर निकाल देण्यात आला. यातील चेतन पगारे, अमन जट या दोघांना दोषी ठरवत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान तब्बल साडे नऊ वर्ष सुरु असलेल्या खटल्यावर सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज निकाल लागला.
सरकार पक्षाकडून या खटल्यात आतापर्यत विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी एकूण ३५ साक्षीदार तपासले आहेत. या दोषींना बिपिनचे अपहरण करूंन खून करत मृतदेह एका शेतात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद मिसर यांनी न्यायालयात केला. अत्यंत थंड डोक्याने पूर्वनियोजीत कात रचून हा खून करण्यात आल्याचे न्यायालयात त्यांनी सांगितले. दरम्यान मयत बिपीन याचे वडील व्यवसायिक गुलाबचंद बाफना हे दोषींना रक्कम देण्यास तयार झाले होते. त्यांनी मोबाईलवर त्यांच्याशी याबाबत बोलत मी पैसे देतो, पण मुलाशी मला बोलू द्या ' अशी विनवणी केली होती. मात्र दोषींनी त्यांच्या तरुण मुलाला ठार मारले, असा युक्तिवाद ऍड. अजय मिसर यांनी केला.
नेमकं काय घडलं होत?
नाशिकमध्ये साडेनऊ वर्षांपूर्वी एक कोटीच्या खंडणीसाठी (Extortion) मुलाचे अपहरण (Kidnap) करून त्याची हत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 8 जून 2013 रोजी मयत विपीन गुलाबचंद बाफणा हा डान्स क्लासला जाऊन येतो असे सांगून गेल्यानंतर त्याचे अपहरण करीत अज्ञात व्यक्तीने विपिनच्या मोबाईलवरून गुलाबचंद बाफना यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली होती. मात्र, पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी विपीन बाफना याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)