Nashik News : दरेवाडीची शाळा सुरु झाली, मात्र काही तासांपुरतीचं, आता थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घालणारं!
Nashik News : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील दरेवाडी येथे शाळा सुरू झाली, मात्र शाळा सुरू झाल्याचा आनंद अल्पकाळ टिकला.
Nashik News : विद्यार्थ्यांच्या दोन आंदोलनानंतर अखेर दरेवाडीची शाळा (Darevadi School) सुरू झाली, मात्र ती काही तासांपुरतीच. शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी दरेवाडीला भेट देत दिलेल्या आश्वासनाबाबत घुमजाव केले. प्रशासनाने भाम धरण (Bham Dam) वस्तीवरील त्या 43 विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात आले असून आता इथे शाळा भरवता येणार नाही, असे सांगण्यात आल्याने ग्रामस्थांनी पुन्हा संताप व्यक्त केला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळा मागील महिन्यात बंद करण्यात आली. ही शाळा बंद करू नये म्हणून ऑगस्ट महिन्यात इगतपुरीला पायी जाऊन आंदोलन करण्यात आले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शाळा बंद करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर शाळा बंद करण्यात आली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा 'शाळा नको शेळ्या बोलायला द्या' अशी अनोखी मागणी करत जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. यानंतर प्रशासनाने आश्वासन देत पुन्हा एकदा दरेवाडी येथे शाळा सुरू झाली मात्र शाळा सुरू झाल्याचा आनंद अल्पकाळ टिकला.
शिक्षण अधिकारी कनोज (Education Officer Bhaskar Kanoj) यांनी गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकाऱ्यांच्या समवेत बुधवारी दरेवाडी येथील शाळेला भेट दिली त्यावेळी शाळेसंदर्भात शहानिशा करत ग्रामस्थांशी संवाद साधला. मूळच्या दरेवाडी शाळेत दाखल असलेले 43 विद्यार्थी दरेवाडी किंवा नजीकचे शाळेत जाण्याची सहमत नाहीत. तत्कालीन परिस्थिती त्यांच्यासाठी वस्ती मधील पत्र्याच्या शेड मिळतात पुढच्या स्वरूपात अध्यपानची सोय केली होती. या पत्र्याच्या शेडमध्ये अध्ययन अध्यापनाचा अनुकूल वातावरण नाही, तसेच विद्यार्थी सुरक्षा धोका संभवतो. या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध झाल्याने परिपूर्ण तयारी करून घेणे अडचणीचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे नजीकचे शाळेत समायोजन केल्या जाणार असल्याचा अहवाल कॉलेज यांनी सादर केला. त्यामुळे पुन्हा एकदा येथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत जावे लागणार असल्याचे ग्रामस्थांना निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दरम्यान दरेवाडीची शाळा बंदच करण्याचे शिक्षण विभागाने ठरवले असल्याने राज विद्यार्थ्यांनी शाळेचा कायमचा निरोप घेतला. उद्या शुक्रवार रोजी हे विद्यार्थी दप्तर, गणवेश शैक्षणिक साहित्य जवळच्या भाम धरणात विसर्जन करण्यास जाणार आहेत. त्यानंतर शनिवारी हे विद्यार्थी थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार असून उदरनिर्वाह करण्यासाठी शेळी देण्याची आग्रही मागणी करण्यात येणार आहे. शेळ्या मिळत नाही तोपर्यंत तिथून हलणार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते भगवान मध्ये त्यांनी सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी आंदोलन
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांनी 'दप्तर जमा करा, आम्हाला वळण्यासाठी शेळ्या द्या' असे अनोखे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने खुलासा करताना दरेवाडी गावापासून एक ते अडीच किलोमीटर अंतरावर तीन-तीन शाळा असल्याचा दावा केला आहे. भाम धरण प्रकल्पांतर्गत गाव विस्थापित झाल्यानंतर त्या गावाचे पुनर्वसन झाले असून तेथे शाळा ही सुरू करण्यात आली आहे. मात्र भाम धरण प्रकल्प 2018 ला कार्यान्वित झाला असून दरेवाडी येथे तीन वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचा दावा ग्रामस्थांनी करत शिक्षण विभागाने केवळ शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याने हे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे, म्हणून समायोजनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान मध्ये यांनी केला आहे. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटून विद्यार्थ्यांची समस्या मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता आहे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याने मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.