Nashik Christmas : नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातलं एकमेव बाल येशू मंदिर, खिसमस निमित्त येशू मंदिरे सजली!
Christmas Special : नाशिकमध्ये ख्रिसमस निमित्ताने येशूची विविध मंदिरे असून सर्व मंदिरे सजली आहेत.
Christmas Special : ख्रिसमस (Christmas) सणासाठी देशभरात उत्साह असून नाशिक (Nashik) शहरात देखील मोठ्या उत्साहात नाताळ सणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये देखील येशूची विविध मंदिरे असून ख्रिसमस निमित्ताने सर्व मंदिरे सजली असून विविध कार्यक्रमांची मेजवानी या मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
नाशिकला मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याच नाशिकमध्ये अनेक येशू मंदिरे पाहायला मिळतात. यामध्ये हॉली क्रोस चर्च, संत आंद्रिया चर्च, नाशिकरोडचे बाळ येशू मंदिर, सेंट पॅट्रिक चर्च, नाशिक बॅप्टिस्ट चर्च सेंट अल्फोन्सा चर्च अशी येशूचे मंदिरे पाहायला मिळतात. अवघ्या काही तासांवर ख्रिसमस सण आल्याने या मंदिरांना झळाळी मिळाली असून ख्रिचन बांधव मोठ्या उत्साहात नाताळ सण साजरा करतात. त्याचप्रमाणे शहरातील विविध चर्चमध्ये गर्दी होऊ लागली असून येशू खिस्ताचा जन्मोत्सव असल्याने ख्रिस्ती बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर अनेक चर्चमध्ये येशू जन्माचा विलोभनीय देखावा उभारण्यात आला आहे.
बाळ येशू मंदिर
नाशिकमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकरोड परिसरात बाळ येशू चर्च (Bal Yeshu Church) असून या चर्चचे उद्घाटन 1970 मध्ये झाले आहे. या मंदिरात शिशु येशूची 19 इंंचाची मूर्ती असून, मूर्ती शाही पोशाखाने झाकलेली असते. ख्रिश्चन बांधवांकडून चर्चमध्ये विविध कार्यक्रम केलं जातात. हे चर्च सकारात्मकता, कृपा आणि आशीर्वादांनी भरलेले आहे. या चर्चमध्ये अनेक सेलिब्रिटींनी भेट दिली असून आजही अनेक भाविकभक्त या ठिकाणी जाऊन दर्शन घेत असतात. तर बाल येशु यात्र उत्सव फेब्रुवारी महिन्यात साजरा होतो.
होली क्रॉस चर्च
नाशिकमधील त्रंबक नाक्यावर कॅथोलिक आश्रमाजवळ होली क्रॉस चर्च Holy Cross Church) आहे. हे चर्च 1990 मध्ये स्थापन झाले असून दूरवरून हे चर्च लक्ष वेधून घेते. कॅथोलिक होली क्रॉस ट्रस्ट अंतर्गत चर्च कार्य करते, त्याचबरोबर आय ठिकाणी असलेल्या टिळक वाचनालयात हजारो पुस्तके आहे. या चर्चची वास्तूशैली अतिशय सुंदर असून सर्व आधुनिक सुविधांचा समावेश आहे.
सेंट पॅट्रिक चर्च
नाशिकमधील देवळाली परिसरात सेंट पॅट्रिक शाळेजवळ सेंट पॅट्रिक चर्च आहे. हे एक कॅथोलिक चर्च असून नाशिक शहरातील सर्वात महत्वाचे ठिकाण आहे. सेंट पॅट्रिक चर्चमध्ये सर्वाधिक संख्येने रहिवासी आहेत. चर्चचे स्थापत्य आणि संरचनात्मक सौंदर्य टिकुनआहे. गर्दीच्या जगातही अशा प्रकारे, मानसिक आणि आध्यात्मिक सुसंवाद साधण्यासाठी अनेकजण चर्चला भेट देतात.
दिडशे वर्षाचे सेंट आंद्रिया चर्च
नाशिकजवळील शरणपूर लिंक रोडजवळ सेंट आंद्रिया चर्च (Sent Andriya Church) आहे. सेंट आंद्रिया चर्च हे 155 वर्षांपूर्वी स्थापन झालेले अँग्लिकन चर्च आहे. हे शहरातील सर्वात प्रमुख चर्चांपैकी एक आहे. ते शहराच्या मध्यभागी असून शेकडो भाविक रविवारी आशीर्वाद घेण्यासाठी हजेरी लावतात. या चर्चची वैशिष्ट्य म्हणजे, या चर्चची रचना अशी केली आहे की, चर्चवर कधीही वीज पडत नसल्याचे सांगितले जाते. तसेच आकाशातून चर्च बघितल्यास या चर्चला क्रॉसचा आकार देण्यात आला आहे.
नाशिक बॅप्टिस्ट चर्च
नाशिकमधील टिळक रोडजवळ नाशिक बॅप्टिस्ट चर्च आहे. शहरातील मध्यवर्ती स्थानामुळे, हे चर्च बहुंताशा वेळा नाशिक तसेच देशभरातील अभ्यागतांनी भरलेले असते. हे एक बाप्टिस्ट रिफॉर्मिंग चर्च असून जे पवित्र बायबलच्या वास्तविक शिकवणी शिकवण्याच्या दिशेने कार्य करते, असे चारच्या प्रशासनाच्या म्हणणे आहे. चर्चचे मूळ उद्दिष्ट सर्वांना एकता आणि शांतीची शिकवण देणे हेच आहे. नाशिकमध्ये हे सर्वात सुंदर चर्च असल्याचे सांगितले जाते.